Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राजमाता जिजाऊ जयंती निमित्त शिवसेनेतर्फे उपजिल्हा रुग्णालयात भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
राजमाता जिजाऊ जयंती निमित्त शिवसेनेतर्फे उपजिल्हा रुग्णालयात भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली

स्वच्छता मोहिमेत आ.चंद्रकांत पाटील स्वतः झाले सहभागी 

मुक्ताईनगर(प्रतिनीधी)- येथील उपजिल्हा रुग्णालयात राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून दि १२ जानेवारी रविवार रोजी आ.चंद्रकांत पाटील यांच्या प्रत्यक्ष सहभागाने शिवसेनेच्या वतीने भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली . सर्वात आधी रुग्णालयात स्वच्छता यशस्वीरीत्या संपन्न झालेवर तेथेच माँसाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेस डॉक्टर व कर्मचारी यांचेसह आ.पाटील यांनी  माल्यार्पण केले व प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. आ. चंद्रकांत पाटील यांनी लोकप्रतिनिधींचे कर्तव्य काय ? आणि कसे ? असते. सर्वसामान्य लोकांना लोकप्रतिनिधी आपणच आहोत याची चुणूक दाखविण्याचे त्यांचे पुरेपूर प्रयत्न वेगवेगळ्या कार्यशैलीतून दिसून येत आहेत . यातूनच शनिवारी शस्त्रक्रियेच्या आधुनिक साहित्यानी अद्यायवात अशा ऑपरेशन थिएटरचे लोकार्पण करतांना त्यांना येथे प्रचंड घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य दिसून आल्याने त्यांनी लागलीच राजमाता जिजाऊ ची जयंती या परिसरात स्वच्छता मोहीम राबवून करण्याची सूचना शिवसैनिक व पदाधिकारी यांना दिली. बोले तैसा चाले… यानुसार कर्त्यव्य रुपात येऊन रविवार  दि १२ रोजी सकाळीच आ.पाटील व शेकडो शिवसैनिक पदाधिकारी यांची टीम ” रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा ” हे ब्रीद घेऊन उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाली. निव्वळ बोट ठेवून कामे न करता स्वतः सहभागी होत कार्य तडीस नेण्याची हातोटी असलेल्या आ.चंद्रकांत पाटील यांनी सर्वात आधी रुग्णालयात साफसफाई मोहीम फत्ते केली. व मोठ्या उत्साहात डॉक्टर व कर्मचारी यांचेसह आमदार यांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. तसेच यानंतर तुषार बोरसे दत्तप्रभु कन्स्ट्रक्शन चे जेसीबी, ढंपर, रोडरोलर, ट्रॅक्टर आणि रोटरव्हेटर आधी साहित्य वापरून बाहेरील परिसर स्वच्छ केला. तसेच सहभागी झालेल्या शेकडो पदाधिकारी व शिवसैनिकानी हातात झाडू घेऊन परिसर झाडून पुसून साफ केला .यात उपजिल्हा रुग्णालयाचे कर्मचारीही सहभागी झाले होते. स्वराज्य जननी माँसाहेब जिजाऊ यांची आगळ्यावेगळ्या पद्धतीने जयंती साजरी केल्याने रुग्णालयातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक तसेच सुज्ञ नागरिकांकडून आ.पाटील यांचे कौतुक होत आहे.  प्रसंगी डॉ. योगेश राणे, डॉ. नम्रता अच्छा, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य अँड मनोहर खैरनार, अल्पसंख्यांक जिल्हा संघटक अफसर खान, तालुका प्रमुख छोटू भोई, माजी उपजिल्हा प्रमुख गोपाळ सोनवणे, माजी सरपंच मुशीर मणियार, जाफर अली, जहीर शेख, सलीम खान, शकुर जमदार, विधानसभा संघटक अमरदीप पाटील, उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, पिंटू पाटील, विठ्ठल तळेले, राजेंद्र तळेले, स्विय सहाय्यक प्रवीण चौधरी, शहर संघटक वसंत भलभले, गटनेता राजेंद्र हिवराळे,  महेंद्र मोंढाळे, युवासेना उपजिल्हा प्रमुख पवन सोनवणे, पंकज राणे, नामदेव भिल्ल, दीपक खुळे, आकाश सापधरे, चेतन पाटील, गौरव दुट्टे, सोपान मराठे, शुभम शर्मा, चेतन कांडेलकर, राजू कापसे, रितेश सोनार, स्वप्नील श्रीखंडे, गौरव काळे, मुकेश डवले, शुभम तळेले,  मनोज मराठे प्रमोद सौंदळे, पप्पू मराठे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आदिवासी वसतिगृहात मराठी भाषा संवर्धन कार्यक्रम

Next Post

श्री समर्थ विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

Next Post

श्री समर्थ विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo