Friday, May 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा पथकाच्या कारवाईत ३१ लाख रुपये किमतीचा बनावटी विदेशी मद्यसाठा वाहनासह जप्त

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
28/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा पथकाच्या कारवाईत ३१ लाख रुपये किमतीचा बनावटी विदेशी मद्यसाठा वाहनासह जप्त

मुंबई(प्रतिनिधी)- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाने बटकणंगले ता, गडहिंग्लज येथे केलेल्या कारवाईत एकूण 31,40,200 रुपये किंमतीचा गोवा बनावटीचा विदेशी मद्य साठा वाहनासह जप्त केला आहे.

आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, श्री. कांतिलाल उमाप व संचालक उषा वर्मा (दक्षता व अंमलबजावणी), राज्य उत्पादन शुल्क, विभागीय उपआयुक्त राज्य उत्पादन शुल्क, ठाणे विभाग सुनिल चव्हाण विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभाग, श्री. वाय.एम. पवार यांचे आदेशान्वये तसेच कोल्हापूर जिल्हा अधीक्षक श्री. रविंद्र आवळे व उपअधीक्षक श्री. दादासाहेब दराडे राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा भरारी पथकास दि. 25 ऑक्टोबर 2021 रोजी बटकणंगले, जांभुळवाडी रोडवरून काही जणांकडून बेकायदा गोवा बनावट मद्याची वाहतुक होणार असल्याची गुप्त बातमी मिळाली, त्यानुसार या मार्गावर पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना रात्री 12.00 वाजण्याच्या सुमारास बटकणंगले ता. गडहिंग्लज हद्दीत जांभुळवाडीकडे जाणाऱ्या रोडलगत कच्च्या पाणंद रोडवर एक सहाचाकी टाटा KA-25-C-0701 ट्रक थांबलेला व संशयास्पद हालचाली दिसून आल्या. या ठिकाणी जावून छापा घातला असता तेथील व्यक्ती अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.

कर्मचाऱ्यांनी वाहनाची कसून तपासणी केली असता हौद्यामध्ये व हौद्याच्या वरती हुडाला असलेल्या पत्र्याच्या प्लेटाची बारकाईने पाहणी करताना वर चोरकप्पा केल्याचे दिसून आले. पत्र्याच्या प्लेटा काढून पाहिले असता कप्प्यामध्ये विविध ब्रँडचे गोवा बनावटीचे विदेशी मद्य असल्याचे आढळले. आतमध्ये फक्त गोवा राज्यात विक्रीसाठी असलेले विदेशी मद्याचे 750 मिलीचे बॉक्स मिळून आले.

संशयित आरोपीत निखील उर्फ बल्या दत्ता रेडेकर, मारुती इराप्पा पाटील, भरमु यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.छाप्यात वाहनामध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्यांचे इम्पेरियल ब्ल्यु रिझर्व सेव्हन इम्पेरियल ब्ल्युरॉयल स्टॅग, गोल्डन एस ब्ल्यु व्हिस्को तसेच गोल्ड ॲन्ड ब्लॅक XXX रम व ग्रीन अॅपल वोडका या ब्रँडच्या 750 मिली व 180 मिली क्षमतेच्या बाटल्या असलेले एकुण 325 बॉक्स व टुबर्ग स्ट्रॉग बिअरचे 500 मिलीचे टिनचे 05 बॉक्स असे एकुण 330 बॉक्स इतके मद्य मिळून आले असून त्याची बाजारभावानुसार एकूण रु.21,40,200/- इतकी किंमत असुन गुन्ह्यांत मिळून आलेले वाहन यांची मिळून 10,00,000/- इतकी किंमत असून एकूण जप्त मुद्देमालाची किंमत रु.31,40,200/- इतकी आहे.गुन्ह्यांतील पसार आरोपी इसमांचा शोध सुरू असल्याचे पथक प्रमुख निरीक्षक श्री.संभाजी बरगे यांनी सांगितले.

कारवाईत राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक कोल्हापूरचे निरीक्षक संभाजी बरगे, दुय्यम निरीक्षक संजय मोहिते, विजय नाईक, जवान सर्वत्री संदीप जानकर सागर शिंदे, सचिन काळेल. मारुती पोवार, राजु कोळी, जय शिनगारे यांनी सहभाग घेतला.गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे असे निरीक्षक संभाजी बरगे यांनी सांगितले.

Team Satymev Jayate

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

राज्यपालांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद; कृषी विद्यापीठाच्या विविध प्रकल्पांची पाहणी

Next Post

राज्यातील ‘आयटीआय’च्या आधुनिकीकरणासाठी विविध उपाययोजना राबविणार -कौशल्य विकास मंत्री

Next Post
राज्यातील ‘आयटीआय’च्या आधुनिकीकरणासाठी विविध उपाययोजना राबविणार -कौशल्य विकास मंत्री

राज्यातील ‘आयटीआय’च्या आधुनिकीकरणासाठी विविध उपाययोजना राबविणार -कौशल्य विकास मंत्री

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d