Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रिक्षा चालकांनी मीटरप्रमाणे भाडे नाकारल्यास होणार परवाना निलंबनाची कारवाई;उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/03/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
रिक्षा चालकांनी मीटरप्रमाणे भाडे नाकारल्यास होणार परवाना निलंबनाची कारवाई;उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही

जळगाव (जिमाका) दि. 10 – जळगाव शहरातील सर्व ऑटोरिक्षा चालकांना सुचित करण्यात येते की, ज्या ऑटोरिक्षा चालकांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव यांचेकडून प्रवासी वाहतूकीसाठी परवाना घेतला आहे. त्यासर्व ऑटोरिक्षा चालकांना परवाना अटीप्रमाणे प्रवासी वाहतूक करतांना मीटरप्रमाणे भाडे घेणे बंधनकारक आहे. प्रत्येक परवाना धारक ऑटोरिक्षाला मोटर वाहन नियम 119 व 137 अन्वये इलेक्ट्रॉनिक्स मीटर असणे बंधणकारक आहे. त्याचप्रमाणे ते सुस्थीतीत असणे देखील बंधनकारक आहे. कुठल्याही परिस्थीत परवाना अटींने उल्लंघन करता येत नाही.

एखाद्या प्रवाशाने मीटरप्रमाणे भाडे देऊ असे म्हटल्यास रिक्षा चालकाने मीटरप्रमाणे भाडे घेणे अनिवार्य असुन ही बाब कायदेशिर आहे. परंतु उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथे शहरातील अनेक प्रवाशांनी तक्रार केली आहे की, रिक्षा चालक मीटरप्रमाणे भाडे घेण्यास नकार देतात व ही बाब रिक्षा परवान्याचे उल्लंघन करणारी आहे.

सर्व ऑटोरिक्षा परवाना धारकांना आवाहन व सुचित करण्यात येते की, त्यांनी ऑटोरिक्षा फेअरमीटर कॅलिब्रेशन करुन घ्यावे तसेच प्रवाश्यांचा मागणी असल्यास फेअरमीटरचा वापर करुन प्रवाशी वाहतूक करावी अन्यथा अशाप्रकारचे पालन न करणाऱ्या परवाना धारकाविरुद्ध मोटार वाहन कायाद्यातील तरतुदीनुसार परवाना निलबंनाची दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

तसेच जळगाव शहरातील तमाम नागरिकांना कळविण्यात येते की, जळगाव शहरात ऑटो रिक्षाचालक आपणाकडून मीटरप्रमाणे भाडे आकारणी करीत नसतील तर आपण अशा ऑटो रिक्षा चालकाविरुद्ध उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव कार्यालयाच्या दुरध्वनी क्रं. 0257-2262619 किंवा [email protected] या संकेतस्थळावर तक्रार करावी. त्यानुसार संबंधित परवाना धारकाविरुद्ध कायद्यातील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल. असे श्याम लोही, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राज्य माहीती आयोगाचा दणका;निलेश चाळक यांच्या प्रकरणात जनमाहीती अधिकारी शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद बीड यांना पाच हजार रुपये दंड

Next Post

प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथे कोरोना लसीकरण कार्यक्रम मोहिमेचा शुभारंभ

Next Post
प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथे कोरोना लसीकरण कार्यक्रम मोहिमेचा शुभारंभ

प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथे कोरोना लसीकरण कार्यक्रम मोहिमेचा शुभारंभ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo