Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वाहन चालविताना वेग मर्यादेबरोबरच सुरक्षेचाही विचार आवश्यक जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
वाहन चालविताना वेग मर्यादेबरोबरच सुरक्षेचाही विचार आवश्यक                                                  जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे

जळगाव-(जिमाका) :- वाहन चालवितांना वेग मर्यादा ,वाहतूक नियमांचे पालनाबरोबरच आपल्यासोबत असलेल्या सहकार्याचा,सहप्रवाश्याचा आणि रस्त्यावर चालणाऱ्या पादचाऱ्यांच्याही सुरक्षेचा विचार वाहन चालकाने केल्यास सुरक्षा अबाधित राहून जिवीत तसेच वित्त हानी टाळता येईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत केले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगले,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा रस्ता सुरक्षा समिती जळगाव श्याम लोही, सहाय्यक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण,जळगावचे प्रकल्प संचालक सी.एम.सिन्हा, नहीचे हितेश अग्रवाल,मनपाचे सी.एस.सोनगिरे, पोलिस विभाग, राज्य परिवहन विभाग , शिक्षण्‍ विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी तसेच मक्तेदार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे पुढे म्हणाले की, रस्ता सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करताना अनेक अडथळे येतात त्यात प्रामुख्याने पार्किंग प्रश्न, नो एन्ट्रीच्या ठिकाणी वाहने उभी करणे, चुकीच्या पद्धतीने वाहने पार्क करणे. यामुळे रस्ता वाहतुकीला अडचणी येतात. अवैध वाहतूकीला आळा बसविण्यासाठी जिल्हा प्रादेशिक परिवहन , पोलीस विभागाचा वाहतूक विभाग आणि राज्य परिवहन मंडळाने समन्वयाने काम केल्यास अवैध वाहतूकीला आळा बसण्याबरोबरच राज्य परिवहन मंडळाच्या उत्पानात वाढ होण्यास मदत होईल.त्यासाठी राज्य परिवहन मंडळाने यात्रा, बाजार,उत्सव अशा प्रसंगी विशेष जादा बसेसची व्यवस्था केल्यास प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होवून मंडळाच्या उत्पनातही वाढ होईल,
अनधिकृत वाहने आणि मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी किंवा विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांचे परवाने तात्काळ रद्द करावेत. शाळा महाविद्यालयांमध्ये पालक-शिक्षक सभांना वाहतूक पोलीस व परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून वाहनाच्या मर्यादेपेक्षा जास्त विद्यार्थी प्रवास करण्याने आपल्या पाल्याच्या जिवापेक्षा पैसा महत्वाचा नसून 200 ते 300 रूपये जास्त लागत असल्यास व मर्यादित संख्येत विद्यार्थी घेवून जाणाऱ्या वाहनातूनच आपल्या पाल्याला पाठवावे. असे त्यांचे प्रबोधन करावे. अपघातग्रस्त व्यक्तीला वाचविणे हे आपले प्रथम कर्तव्य मानले पाहिजे. यासाठी प्रत्येकाने सामाजिक भावनेतून 108 क्रमांकावर कॉल करून रुग्णवाहिका बोलवणे, अपघातग्रस्त व्यक्तीं कोण आहे, हे महत्वाचे नाही तो माणूस आहे. हे लक्षात घ्यावे.
रस्ते बांधणीतील यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्टीय महामार्ग प्रकल्प , नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदेतील बांधकाम विभाग यांनी बांधकाम यांनी रस्ते तयार करतांना किंवा दुरूस्ती तथा नुतनी करणाच्या वेळेस मक्तेदारांची गुणवत्ता लक्षात घ्यावी. शहर, गाव किंवा अन्य कोणत्याही ठिकणी तयार केलेले अनावश्यक गतीरोधक तात्काळ काढून टाकावेत. रस्तांचे कामे चालू असतांना अपघात व वाहन धारकांना त्याची कल्पना येणासाठी मक्तेदारांनी आवश्यक दिशानिर्देशक फलक, बॅरिकेट्स लावणे आवश्यक आहे. व ते लावले गेले नसल्यास अशा रस्ते बनविणाऱ्या मक्तेदारांवर कठोर कारवाई करावी .
रस्ते वाहतूक नियमांचा प्रचार व प्रसार होण्यासाठी शाळा महाविद्यालयांमधून वाहतूक नियमांचे पालन आणि सुरक्षित वाहतूक अशा आशयाचे घोषवाक्य आणि विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे प्रबोधन आणि प्रचारातून सुरक्षित वाहतुकीचे महत्व सांगणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावेत.त्यासाठी विविध सामाजिक संस्थांची मदत घेण्यात यावी, असेही शेवटी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी सर्व संबंधित यंत्रणांना सूचित केले.
प्रारंभी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी सुरक्षित वाहतूक व रस्ते सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उप प्रादेशिक परिवहन विभाग करत असलेल्या कामांचा लेखा-जोखा सादर करून या कार्यास सर्व संबंधित यंत्रणांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जोडीदाराची विवेकी निवड युवा संकल्प परिषदचे १२ जानेवारी रोजी आयोजन

Next Post

राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर

Next Post
राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता तथा जिल्ह्याचे पालकमंत्री                                   ना.गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर

राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo