Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विधानसभा निवडणुक गणेशोत्सवानंतर जाहीर होण्याची शक्यता

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/08/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read

मुंबई -(प्रतिनिधी)- सध्या राज्यात गणेशोत्सवाची धामधूम असली तरी नागरिकांमध्ये विधानसभा निवडणुकीची तारखेची उत्सुकताही तेवढीच आहे. आता लवकरच ही उत्सुकता संपणार आहे, कारण विधानसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा गणेशोत्सवानंतर लगेचच होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवानंतरच 2014 च्या विधानसभा निवडणुकीची घोषणाही झाली होती.

9 नोव्हेंबर 2019 रोजी सध्याच्या तेराव्या विधानसभेचा कार्यकाळ संपत असल्यामुळे निवडणुकीची सगळी प्रक्रिया त्याआधी पूर्ण करणे निवडणूक आयोगाला बंधनकारक आहे. म्हणूनच 2019 च्या विधानसभा निवडणुकीची घोषणा गणेशोत्सव संपल्यानंतर कधीही होऊ शकते.2014 मध्ये गणेशोत्सवानंतर विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊन आणि 12 सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू झाली होती. 15 ऑक्टोबर रोजी मतदान पार पडले होते आणि 19 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर झाला होता. यानंतर 31 ऑक्टोबर रोजी सरकारचा शपथविधी झाला होता. त्यामुळे आता कोणत्या तारखेला मतदान आणि मतमोजणी होणार, आचारसंहिता लागू होणार याची उत्सुकता आहे.

यंदा 2 ते 12 सप्टेंबर या कालावधीत राज्यात गणेशोत्सव आहे. 2 सप्टेंबरला गणेश चतुर्थी असून 12 सप्टेंबरला अनंत चतुदर्शी आहे. या दिवशी गणेश विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

धक्का लागल्याने कोयत्याने वार;तिघांना अटक

Next Post

आझाद मैदानावर आंदोलकांवर लाठीमार;जखमींमध्ये जळगावातील शिक्षकाचा समावेश

Next Post
आझाद मैदानावर आंदोलकांवर लाठीमार;जखमींमध्ये जळगावातील शिक्षकाचा समावेश

आझाद मैदानावर आंदोलकांवर लाठीमार;जखमींमध्ये जळगावातील शिक्षकाचा समावेश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo