Monday, September 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/06/2026
in जळगाव
Reading Time: 1 min read
विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

जळगाव दिनांक 22 जून (जिमाका) : केंद्र पुरस्कृत योजनांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. २७ मे २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना लाभार्थ्यांना हयातीचे दाखले सादर करणे आवश्यक असल्याबाबत यापूर्वी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सूचित करण्यात आले होते.

मात्र अद्यापपर्यंत संजय गांधी योजना, नपा क्षेत्र जळगाव शहर अंतर्गत लाभ घेणाऱ्या एकूण लाभार्थ्यांपैकी केवळ ४० टक्के लाभार्थ्यांनी हयातीचे दाखले सादर केले आहेत.

त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांना पुनश्च आवाहन करण्यात येत आहे की, लाभार्थ्यांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये सत्यापन अॅप उपलब्ध असल्यास त्याद्वारे किंवा नातेवाईकांच्या मदतीने तसेच संजय गांधी योजना कार्यालय, नपा क्षेत्र जळगाव शहर, रेल्वे स्टेशन रोड येथील ग्राम महसूल अधिकारी, कार्यालयातील संगणक परिचालक कर्मचारी अथवा जवळील आपले सरकार सेवा केंद्रामार्फत हयात प्रमाणपत्र (डिजिटल लाईफ सर्टिफिकेट) ऑनलाइन पद्धतीने प्राप्त करून ते दि. ३० जून २०२६ पर्यंत संजय गांधी योजना कार्यालय, नपा क्षेत्र, जळगाव शहर, रेल्वे स्टेशन रोड येथे जमा करावे.

निर्धारित मुदतीत हयातीचा दाखला सादर न केल्यास संबंधित लाभार्थ्यांचे अनुदान बंद होऊ शकते त्यामुळे हयातीचा दाखला सादर करण्याचे  आवाहन तहसीलदार रुपाली काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

Next Post
लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo