Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

“शावैम” मध्ये कोरोना रुग्णांसाठी खाटा वाढणार; जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विविध निर्णय

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/03/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
“शावैम” मध्ये कोरोना रुग्णांसाठी खाटा वाढणार; जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विविध निर्णय

जळगाव : वाढत्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांसाठी वाढीव खाटा दोन दिवसात सुरु करण्यात येणार आहे. तसेच कोरोना विरहित रुग्णांना डिस्चार्ज देऊन “नॉन कोविड” सेवा इतर दवाखान्यात हलविण्यात येत आहे. शुक्रवारी १९ मार्च रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भेट देऊन माहिती जाणून घेतली.

जिल्हयात कोरोना महामारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून शासकीय रुग्णालय पुन्हा पूर्ण कोविड करण्याविषयी प्रशासनाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राऊत यांनी भेट देऊन रुग्णालयातील अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. यावेळी प्रभारी अधिष्ठाता डॉ. अरुण कसोटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी रुग्णालयातील कोरोनाविषयीची सद्यस्थिती आणि कोरोना विरहित दाखल असणाऱ्या रुग्णांची व ओपीडीची सद्यस्थिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. इम्रान पठाण, कोविड इन्चार्ज डॉ. विजय गायकवाड यांच्याकडून जिल्हाधिकारी राऊत यांनी जाणून घेतली. अडचणी समजून घेतल्या. कमतरता असल्याने मनुष्यबळाविषयीदेखील माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. वॊर्ड क्रमांक ७,८,९ येथे दोन दिवसात ६५ खाटा उपलब्ध करता येणार असून सी १ हा कक्ष लवकर बंद करण्यात येईल व त्याठिकाणी अपघात विभाग कालांतराने स्थलांतर करण्यात येणार आहे, असा निर्णय यावेळी झाला.

“नॉन कोविड” रुग्णांना डॉ. उल्हास पाटील रुग्णालय किंवा मनपाच्या शाहू महाराज दवाखाना येथे हलविणे सुरु करण्यात आले आहे. त्या ठिकाणी रुग्णांना वैद्यकीय सुविधा घेता येणार आहे. ऑक्सिजन टॅंकचे वेळापत्रक करावे, जेणेकरून वेळेवर पुरवठा करणे शक्य होईल अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभाग व विषाणू निदान व संशोधन प्रयोगशाळाचा देखील जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा लॅब इन्चार्ज डॉ. शुभांगी डांगे यांचेकडून घेतला. कोरोना नमुने तपासणी बाबत त्यांनी माहिती जाणून घेत अडचणी समजून घेतल्या. येथे आणखी एक नमुना तपासणी केंद्र उभारण्याचे नियोजन करण्यात येईल तसेच आवश्यक ती साधनसामुग्री व मनुष्यबळ उपलब्ध केले जाईल असे जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले. यावेळी बधिरीकरण शास्त्र विभाग प्रमुख डॉ. संदीप पटेल, डॉ. आस्था गणेरीवाल, अधिसेविका कविता नेतकर उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मागासवर्गीय विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

केशवस्मृती प्रतिष्ठानच्या सी.सी.सी मधील १४ रुग्णांनी केली कोरोनावर मात

Next Post
केशवस्मृती प्रतिष्ठानच्या सी.सी.सी मधील १४ रुग्णांनी केली कोरोनावर मात

केशवस्मृती प्रतिष्ठानच्या सी.सी.सी मधील १४ रुग्णांनी केली कोरोनावर मात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo