Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी ; शेतकऱ्यांनी खचून न जाता उमेदीने उभे राहावे -उपमुख्यमंत्री

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
10/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी ; शेतकऱ्यांनी खचून न जाता उमेदीने उभे राहावे -उपमुख्यमंत्री

औरंगाबाद(जिमाका)- मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे व पायाभुत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, याबाबत मदत म्हणून शासन पीक विमा वेळेत देण्याबाबत काम करत असून एनडीआरएफ आणि एसडीआरएफ च्या मदतीने नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील नुकसानीचे उर्वरित पंचनामे तात्काळ पुर्ण करुन मदतीसाठीचे प्रस्ताव सादर करावे, त्याचप्रमाणे या संकटात खचून गेलेल्यांना धीर देऊन योग्य मदत वेळेत करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित मराठवाडा विभागाच्या आढावा बैठकीत दिले.

बैठकीस पालकमंत्री सुभाष देसाई, नांदेडचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, जालन्याचे पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री राजेश टोपे, बीडचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, खासदार फौजीया खान, आमदार सतीश चव्हाण, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता, कृषी सचिव एकनाथ डवले, औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता, मनपा आयुक्त्‍ अस्तिक कुमार पाण्डेय, लातूरचे जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, तसेच जालना, बीड, परभणी, हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दृकश्राव्य पध्दतीने तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

बैठकीत बोलतांना श्री.पवार म्हणाले की, 17 आणि 18 ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या परतीच्या पावसाच्या अनुषंगाने विशेषत: लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना विशेष काळजी घेण्याबाबत सूचना कराव्यात. याचबरोबर मराठवाड्यातील लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी विभागीय आयुक्तांनी विभागीय पातळीवर आढावा घेऊन लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे. रब्बी हंगामासाठी पीक कर्ज पुर्नगठण करण्याबाबत शासन स्तरावर निर्णय घेतला जाईल तसेच खरीप हंगासाठी दिलेली 994 कोटी रुपयांची रक्कम पीक विमा कंपनीला दिली असून ती तात्काळ वितरीत करण्याबाबत प्रशासनाने कार्यवाही करावी.

Team Satymev Jayate

Previous Post

सीवायडिएच्या वतीने बेघर लोकांना रोजगार; अगरबत्ती बनविण्याचे दिले प्रशिक्षण

Next Post

पाळधी येथे शिवरत्न जिवाजी महाले जयंती निमित्त प्रतिमापूजन व लसीकरण शिबिर उत्साहात

Next Post
पाळधी येथे शिवरत्न जिवाजी महाले जयंती निमित्त प्रतिमापूजन व लसीकरण शिबिर उत्साहात

पाळधी येथे शिवरत्न जिवाजी महाले जयंती निमित्त प्रतिमापूजन व लसीकरण शिबिर उत्साहात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo