Thursday, August 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शेतकऱ्यांना ठिबक सिंचन आता ७५ व ८० टक्के अनुदानावर मिळणार -कृषि मंत्री

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
20/11/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
विमा कंपन्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत प्राप्त तक्रारी तातडीने निकाली काढाव्यात -कृषिमंत्री

मुंबई(प्रतिनिधी)- शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना ( प्रति थेंब अधिक पीक) घटक अंतर्गत तुषार व ठिबक सिंचन संच बसविणे करिता अनुदान देण्यात येते. सन २०१७ च्या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना खर्च मापदंडाच्या ५५ टक्के व इतर शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान (केंद्र हिस्सा ६० टक्के व राज्य हिस्सा ४० टक्के) कमाल ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत देण्यात येत होते.

शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेद्वारे ठिबक व तुषार सिंचनासाठी पूरक अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेमध्ये प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ५५ टक्के अनुदाना व्यतिरिक्त २५ टक्के पूरक अनुदान व इतर शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदाना व्यतिरिक्त ३० टक्के पूरक अनुदान कमाल ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यासाठी लागणारा अतिरिक्त आर्थिक भार राज्य शासन उचलणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी फिली आहे.

या योजनेमध्ये राज्यातील अवर्षण प्रवण क्षेत्रातील, शेतकरी आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त अशा एकूण २४६ तालुक्यांचा समावेश होता. शासनाने उर्वरित १०६ तालुक्यांचा समावेश करुन सदर योजना राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये राबविण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. यामुळे राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना वाढीव अनुदानाचा लाभ होणार आहे.

राज्यामध्ये आतापर्यंत २५.७२ लक्ष हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आलेले असून, या नवीन योजनेमुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी ठिबक व तुषार सिंचन संच बसविण्यास चालना मिळेल. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरिता रु.५८९ कोटी रकमेस शासनाची प्रशासकिय मान्यता आहे. सूक्ष्म सिंचनाची योजना ‘मागेल त्याला ठिबक’ या तत्त्वावर राबविणार असून अर्ज केलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ देण्याचा शासनाचा मानस आहे.

लाभार्थ्याची पारदर्शकपणे निवड करणेसाठी शासनाने महाडीबीटी पोर्टल सुरु केले असून, त्यावर शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करुन योजनेचा लाभ घेता येईल. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपले अर्ज महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन पद्धतीने सादर करून सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मंत्री श्री. भुसे यांनी केले आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

सामाजिक न्याय मंत्र्यांनी केलेल्या घोषनेनुसार बार्टीकडून प्रशिक्षणासाठी जाहिरात प्रसिद्ध

Next Post

जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्रातर्फे जिल्हास्तरीय भाषण स्पर्धा

Next Post

जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्रातर्फे जिल्हास्तरीय भाषण स्पर्धा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo