Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहिहंडी उत्सवानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/08/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

मुंबई, दि. 30 :-श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहिहंडी उत्सवानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळून सुरक्षितपणे सण साजरे करण्याचे आवाहन केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणातात की, समाजातील अपप्रवृत्तींचा विनाश करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी जन्म घेतला. भगवान श्रीकृष्णांचा आदर्श ठेवून आपणही वाईट प्रवृत्तींविरोधात ठामपणे उभं राहिलं पाहिजे. वाईट विचारांना तिलांजली दिली पाहिजे. समाजासाठी विनाशकारी ठरणारी गोष्ट नष्ट करण्याचं काम भगवान श्रीकृष्णांनी केलं. आधुनिक काळात विनाशकारी कोरोनाला संपवण्याचा संकल्प श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्तानं आपण करुया.

दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी आनंदाने साजरी केली जाते. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बाळगोपाळांचा हा उत्साह, आनंद आपल्यालाही सुखावतो. परंतु यंदा कोरोनाच्या संकटामुळे आतापर्यंतचे सर्वच सण अतिशय साधेपणाने आपण साजरे केले आहेत. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण जन्माष्टमी साधेपणाने घरीच साजरी करावी. दहीहंडी उत्सव साजरा करू नये. सर्वानुमते घेतलेल्या निर्णयाचे काटेकोर पालन करावे, सार्वमताचा आदर करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. तसेच सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहिहंडीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शेतकरी सेनेचे गटप्रमुख तुकाराम गोपाळ यांच्या हस्ते नवनियुक्त पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत

Next Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून श्रीकृष्ण जन्माष्टमी, दहीहंडीच्या शुभेच्छा

Next Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून श्रीकृष्ण जन्माष्टमी, दहीहंडीच्या शुभेच्छा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo