Sunday, August 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

श्री समर्थ प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात पतंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जाहिरात

जळगांव(प्रतिनीधी)- चढाओढीन चढवीत होते गं बाई, मी पतंग उडवीत होते..! सर्वच जण मकर संक्रांतीचं सुट्टी घेतात आणि पतंग उडविण्याची मजा करतात. लहानग्यांपासून पासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच पतंग उडवण्याचा मनसोक्त आनंद लुटतात. पतंग कटली की ‘वक्काट  वक्काट’ असे म्हटले जाते. वक्काट वक्काटचा उच्चाराचा आवाज तर सर्वच पतंगप्रेमींचे लक्ष वेधून जाते. आणि पतंगप्रेमींचा उत्साह ही यात भर टाकतो. शाळकरी मुले तर आपली तहानभूक विसरून फक्त आपल्या पतंग आकाशात उडविण्यासाठी लक्ष ठेवून असतात. असाच पतंगोत्सव साजरा करण्यात आला तो आव्हाणे शिवारातील श्री समर्थ प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात. या पतंगोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे तथा ग स सोसायटीचे अध्यक्ष मनोज पाटील उपस्थित होते. यावेळी मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला शाळेच्या आवारात पतंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनी या पतंगोत्सवात सहभागी होऊन मनमुराद आनंद लुटला. यावेळी शाळेच्या परिसरात एकच उत्साह दिसून आला. यानंतर शाळेतील शिक्षिका मोहिनी सुरवाडे यांनी आपल्या भारतीय सण मकरसंक्रांती बद्दल माहिती दिली तसेच आभार चैताली पवार यांनी मानले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका हर्षाली पाटील यांच्यासह शिक्षक राहुल पाटील, जयश्री पाटील, सद्दाम तडवी आदी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात
टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलनाच्या राज्य अधिवेशनात जळगाव शाखा सर्वोत्कृष्ट

Next Post

शकुंतला प्राथमिक विद्यालयात संक्रांतीचे औचित्य साधून पतंग निर्मिती कार्यशाळेचे आयोजन

Next Post
शकुंतला प्राथमिक विद्यालयात संक्रांतीचे औचित्य साधून पतंग निर्मिती कार्यशाळेचे आयोजन

शकुंतला प्राथमिक विद्यालयात संक्रांतीचे औचित्य साधून पतंग निर्मिती कार्यशाळेचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo