Friday, June 12, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

संगीत नाटक अकादमीचे प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/06/2026
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
संगीत नाटक अकादमीचे प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर

अशोक पत्की, आनंद भाटे, अरुण नलावडे यांच्यासह:महाराष्ट्रातील दिग्गज व युवा कलावंतांचा राष्ट्रीय गौरव

नवी दिल्ली, दि. 11 : भारतीय संगीत, नृत्य, नाट्य आणि लोककलांच्या जतन व संवर्धनासाठी देशातील
सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या ‘संगीत नाटक अकादमी’च्या वतीने वर्ष 2024 आणि 2025 साठीचे प्रतिष्ठित
‘संगीत नाटक अकादमी फेलोशिप’, ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ तसेच ‘उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा
पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ, दिग्गज तसेच युवा
कलावंतांनी राष्ट्रीय स्तरावर मानाचा सन्मान मिळवत राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा गौरव
वाढविला आहे.
यंदाच्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील संगीत, नाट्य, नृत्य, लोककला आणि पारंपरिक कला
क्षेत्रातील अनेक मान्यवर कलावंतांचा गौरव करण्यात आला आहे. ज्येष्ठ कलावंतांसोबतच युवा
कलाकारांनाही राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळाल्याने महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाला नवी ओळख
मिळाली आहे.

वर्ष 2024 मधील महाराष्ट्राचे पुरस्कार मानकरी

वर्ष 2024 साठी जाहीर करण्यात आलेल्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांमध्ये हिंदुस्तानी शास्त्रीय
गायन क्षेत्रातील ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर आणि अभंग गायनासाठी प्रसिद्ध गायक आनंद भाटे यांचा
समावेश आहे. अभिनय क्षेत्रातील योगदानासाठी अभिनेते अरुण नलावडे, पारंपरिक रंगभूमी क्षेत्रासाठी
मुकुंद मराठे, लोकनृत्य क्षेत्रासाठी सुभाष नारायण नकाशे तसेच नृत्य क्षेत्रातील संशोधन आणि अभ्यासपूर्ण
योगदानासाठी शुभदा वरदकर यांची निवड करण्यात आली आहे.‘उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा
पुरस्कारां’मध्ये हिंदुस्तानी गायनासाठी कृष्ण बोंगाणे आणि अंकिता जोशी, भारूड या लोकसंगीत
प्रकारासाठी भावार्थ रामचंद्र देखणे, बाहुलीनाट्य या दुर्मिळ लोककलेसाठी बाळकृष्ण गणपत मसगे आणि
लोकनृत्य व लोकसंगीतासाठी चेतन वामन खेडेकर यांची निवड झाली आहे.

वर्ष 2025 मधील महाराष्ट्राचे पुरस्कार मानकरी

वर्ष 2025साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांमध्ये शहनाई वादनासाठी शैलेश भागवत, दिग्दर्शन
क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी प्रमोद डी. पवार, नाट्यसंगीत क्षेत्रातील दीर्घकालीन योगदानासाठी ज्येष्ठ
संगीतकार अशोक पत्की तसेच कथक नृत्य क्षेत्रातील विशेष कार्यासाठी मनीषा साठे यांना पुरस्कार जाहीर
करण्यात आला आहे. तसेच ‘उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कारां’मध्ये हार्मोनियम वादनातील
प्रभुत्वासाठी तन्मय देवचके आणि महाराष्ट्राच्या लोकपरंपरेतील जागर या लोकसंगीत प्रकारासाठी प्रवीण
प्रताप जाधव यांची निवड करण्यात आली आहे.

या पुरस्कारांचे स्वरूप अत्यंत प्रतिष्ठेचे असून, अकादमी पुरस्काराचे स्वरूप 1,00,000 रुपये,
ताम्रपट आणि शाल असे आहे, तर युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा
पुरस्कारांतर्गत 25,000 रुपये, ताम्रपट आणि शाल देऊन सन्मानित केले जाते. हे पुरस्कार राष्ट्रपतींच्या
उपस्थितीत आयोजित विशेष समारंभात प्रदान करण्यात येणार असल्याचे अकादमीतर्फे कळविण्यात आले
आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

विधान परिषद स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

Next Post

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

संगीत नाटक अकादमीचे प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर

संगीत नाटक अकादमीचे प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर

विधान परिषद स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

विधान परिषद स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

विटनेर आरोग्य शिबिरात १२१ नागरिकांची तपासणी ;नेस्लेच्या सामाजिक उपक्रमांतर्गत जैन इरिगेशन, गांधी रिसर्च फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम

विटनेर आरोग्य शिबिरात १२१ नागरिकांची तपासणी ;नेस्लेच्या सामाजिक उपक्रमांतर्गत जैन इरिगेशन, गांधी रिसर्च फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo