Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सायकलींग खेळाच्या प्रवेशाकरीता 8 नोव्हेंबर रोजी नैपुण्य चाचणीचे आयोजन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
29/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
सायकलींग खेळाच्या प्रवेशाकरीता 8 नोव्हेंबर रोजी नैपुण्य चाचणीचे आयोजन

जळगाव(जिमाका वृत्तसेवा)- आंतराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने (खेलो इंडिया एक्सलन्स सेंटर) राज्य निपुणता केंद्रातंर्गत सायकलिंग या खेळाकरिता निपुणता केंद्र कार्यान्वित करण्यात आलेले आहे.

या खेळात ज्या खेळाडुंची जन्मतारीख 1 जानेवारी, 2007 ते 31 डिसेबर, 2009 या दरम्यान आहे, अशा खेळाडुंची सायकलिंग या खेळाच्या तज्ञ चाचणी समितीमार्फत समक्ष गुणानुक्रम देवून प्रवेश निश्चित केला जाणार आहे. या खेळाच्या प्रवेशाकरिता जिल्हास्तरावर 8 नोव्हेंबर, 2021 रोजी सकाळी ठिक 9.00 वाजता श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन करण्यात आलेले आहे. जिल्हास्तरावर मुलांकरिता 1600 मीटर धावणे व मुलीसाठी 800 मीटर धावणे तसेच दोघांकरिता उभी लांब उडी, उभी उंच उडी व खेळाडुंची उंची अशा चाचण्यामधून गुणानुक्रमे प्रथम 2 मुले व 2मुलींची निवड करुन राज्यस्तरावर चाचणीकरिता पात्र ठरतील.

त्याचप्रमाणे जे खेळाडू सायकलिंग या खेळात आपल्या जिल्हाकडून राज्य व राष्ट्रीय स्तरावर सहभागी झालेले आहेत. अशा खेळाडूंना थेट राज्यस्तरावर क्रीडा नैपुण्य चाचण्यांकरिता पाठविण्यात येणार आहे. सदर खेळाडुंनी राज्यस्तरावर जातांना सायकलिंग या खेळाचे राज्य व राष्ट्रीय स्पर्धेतील क्रीडा प्राविण्य प्रमाणपत्रांची छायांकित प्रत व मुळ प्रत सोबत न्यावयाची आहे. राज्यस्तरावर क्रीडा नैपुण्य चाचण्यांकरिता पात्र ठरणाऱ्या व थेट निवड झालेल्या खेळाडुंनी 10 नोव्हेंबर, 2021 रोजी सायंकाळी ठिक 5.00 वाजेपर्यंत निवासस्थान, शिवछत्रपती क्रीडापीठ, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे उपस्थित रहावे.

त्यांच्या चाचण्या 11 नोव्हेंबर, 2021 रोजी सकाळी 8.00 वाजता सायकलिंग वेलोड्रॉम, शिवछत्रपती क्रीडापीठ, म्हाळुंगे- बालेवाडी, पुणे येथे घेण्यात येतील. तरी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा/संस्था, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील शाळा, विविध क्रीडा संघटना व क्रीडा मंडळे यांनी जिल्हास्तरावर सायकलिंग या खेळाच्या क्रीडा नैपुण्य चाचण्यांकरिता इच्छुक सहभागी मुलांमुली खेळाडुंनी आपले नाव, जन्मदिनांक (आधारकार्ड/जन्मदाखला सह) इयत्ता, पत्रव्यवहाराचा पत्ता, संपर्क क्रमांकसह व खेळात क्रीडा कामगिरी असेल तर (क्रीडा प्राविण्य प्रमाणपत्रांवर छायांकित प्रतसह) इ. माहितीसह चाचणी कार्यक्रमानुसार उपस्थित रहाण्याबाबत सुचित करावे. अधिक माहितीसाठी श्री. मिनल थोरात (राज्य क्रीडा मार्गदर्शक) 8625946709 यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

कामचुकारपणा भोवला! शाखा अभियंता नरेंद्र आखाडे यांना मुख्याधिकाऱ्यांनी केले निलंबित

Next Post

शासकीय कार्यालयांसह खाजगी आस्थापनांमधील अधिकारी, कर्मचारी व अभ्यागंतासाठी मास्क वापरणे बंधनकारक अन्यथा भरावा लागणार पाचशे रुपये दंड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo