Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सुप्रसिद्ध कर्करोग तज्ञ डॉ.अतुल भारंबे यांच्या ओपीडीला सुरुवात पहिल्याच दिवशी २८ रुग्णांनी घेतला लाभ; कर्करोगी २ रुग्णांवर शस्त्रक्रिया

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/02/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
सुप्रसिद्ध कर्करोग तज्ञ डॉ.अतुल भारंबे यांच्या ओपीडीला सुरुवात पहिल्याच दिवशी २८ रुग्णांनी घेतला लाभ; कर्करोगी २ रुग्णांवर शस्त्रक्रिया

जळगाव – गेल्या आठ वर्षात विविध प्रकारच्या कर्करोगावर दोन हजाराहून अधिक शस्त्रक्रिया करणारे सुप्रसिद्ध कर्करोग तज्ञ डॉ.अतुल भारंबे यांच्या ओपीडीला गुरुवार, १७ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी २८ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला असून दोन शस्त्रक्रियाही झाल्यात. कॅन्सरतज्ञांच्या सेवा येथेच उपलब्ध झाल्याने रुग्णांनीही समाधान व्यक्‍त केले.

गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात सुप्रसिद्ध कर्करोग तज्ञ डॉ.अतुल भारंबे यांच्या सेवेला आजपासून सुरुवात झाली असून यापुढे दर गुरुवारी सकाळी ९ ते १२ या वेळेत त्यांची ओपीडी सुरु असणार आहे. कर्करोगाच्या शस्त्रक्रियांमधील त्यांचा अनुभव दांडगा असून सर्व प्रकारचे कौशल्य वापरुन ते रुग्णसेवा करत असल्याने आज पहिल्याच दिवशी त्यांनी दोन शस्त्रक्रिया केल्यात. यामुळे रुग्णांनी काही लक्षणे जाणवल्यास गुरुवारी रुग्णालयात येवून डॉक्टरांकडून तपासणी करुन घ्यावी, ह्या निशुल्क सेवेचा लाभ घ्यावा आणि विकारमुक्‍त व्हावे.
कर्करोगावर गोदावरीतच उपचार
कर्करोगावर उपचार आता गोदावरीतच उपलब्ध होत असल्याने रुग्णांना मुंबई, पुणे जाण्याची आवश्यकता राहणार नाही. परिणामी रुग्णांचा वेळ आणि श्रम दोन्हींची बचत होणार आहे. तरी रुग्णांनी कर्करोग ओपीडीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

या प्रकारच्या कर्करोगावर उपचार
मुखाचा कर्करोग, घशाचा कर्करोग, स्वरपेटीचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, जठराचा कर्करोग, गर्भाशयासह अन्ननलिकेचा, आतड्यांचा, किडनी, मूत्रमार्ग, स्वादुपिंड तसेच पित्ताशयाच्या कर्करोगावर डॉ.भारंबे हे उपचार करतात.
डॉ.अतुल भारंबे यांचा परिचय
जामनेर तालुक्यातील फत्तेपूर हे मुळ गाव असलेले डॉ.अतुल गजेंद्र भारंबे यांनी डी वाय पाटील मेडिकल कॉलेज, कोल्हापूर येथून एमबीबीएसचे शिक्षण घेतले. त्यानंतर मुंबई येथील जसलोक हॉस्पीटलमधून डीएनबीची पदवी जनरल सर्जरीतून पूर्ण केली. सुपर स्पेशालिटी आणि कॅन्सर सर्जरीचे शिक्षण भरत कॅन्सर हॉस्पीटल, सुरत येथून प्राप्त केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

न्यू सम्राट अशोक क्रिकेट क्लब तर्फे आयोजित खुल्या प्लास्टिक बॉल स्पर्धेचे उद्धाटन

Next Post

खान्देशात पहिले वहीगायन लोककला संमेलनाचे 20 फेब्रुवारी रोजी आयोजन

Next Post
खान्देशात पहिले वहीगायन लोककला संमेलनाचे 20 फेब्रुवारी रोजी आयोजन

खान्देशात पहिले वहीगायन लोककला संमेलनाचे 20 फेब्रुवारी रोजी आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo