Wednesday, September 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सुप्रसिद्ध कर्करोग तज्ञ डॉ.अतुल भारंबे यांची दर गुरुवारी सेवा उपलब्ध

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/02/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
सुप्रसिद्ध कर्करोग तज्ञ डॉ.अतुल भारंबे यांची दर गुरुवारी सेवा उपलब्ध

आठ वर्षात २ हजाराहून अधिक शस्त्रक्रिया; लॅप्रोस्कोपीद्वारेही उपचार पद्धती उपलब्ध

जळगाव – गेल्या आठ वर्षात विविध प्रकारच्या कर्करोगावर दोन हजाराहून अधिक शस्त्रक्रिया करणारे सुप्रसिद्ध कर्करोग तज्ञ डॉ.अतुल भारंबे यांची येत्या गुरुवार, १७ फेब्रुवारीपासून डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात सेवा सुरु होत आहे. कर्करोगाच्या रुग्णावर लॅप्रोस्कोपीद्वारेही ते उपचार करतात.

कर्करोगाच्या शस्त्रक्रियांमधील त्यांचा अनुभव दांडगा असून सर्व प्रकारचे कौशल्य वापरुन ते रुग्णसेवा करतात. गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात प्रत्येक आठवड्यातील दर गुरुवारी डॉ.अतुल भारंबे यांची सकाळी ९ ते १२ या वेळेत ओपीडी राहणार आहे. गेल्या आठ वर्षापासून कर्करोग तज्ञ म्हणून ते सेवा देत असून आतापावेतो २ हजाराहून अधिक शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वीरित्या केल्या आहेत. कर्करोगावर उपचार आता गोदावरीतच उपलब्ध होत असल्याने रुग्णांना मुंबई, पुणे जाण्याची आवश्यकता राहणार नसून त्यामुळे रुग्णांचा वेळ आणि श्रम दोन्हींची बचत होणार आहे. तरी येत्या गुरुवारपासून सुरु होणार्‍या कर्करोग ओपीडीचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

या प्रकारच्या कर्करोगावर उपचार
मुखाचा कर्करोग, घशाचा कर्करोग, स्वरपेटीचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, जठराचा कर्करोग, गर्भाशयासह अन्‍ननलिकेचा, आतड्यांचा, किडनी, मूत्रमार्ग, स्वादुपिंड तसेच पित्‍ताशयाच्या कर्करोगावर डॉ.भारंबे हे उपचार करतात.
डॉ.अतुल भारंबे यांचा परिचय
जामनेर तालुक्यातील फत्‍तेपूर हे मुळ गाव असलेले डॉ.अतुल गजेंद्र भारंबे यांनी डी वाय पाटील मेडिकल कॉलेज, कोल्हापूर येथून एमबीबीएसचे शिक्षण घेतले. त्यानंतर मुंबई येथील जसलोक हॉस्पीटलमधून डीएनबीची पदवी जनरल सर्जरीतून पूर्ण केली. सुपर स्पेशालिटी आणि कॅन्सर सर्जरीचे शिक्षण भरत कॅन्सर हॉस्पीटल, सुरत येथून प्राप्त केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अस्थिरोग तज्ञांद्वारे अ‍ॅसिटाबुलम फ्रॅक्‍चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

Next Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील विविध राज्यांच्या मंत्रीगटाकडून जीएसटी चोरी रोखण्यासह संकलनातील त्रूटी दूर करण्यासाठी सात शिफारशी सादर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo