Friday, August 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सेवा, त्याग, प्रेम अंगिकारा आणि जीवनात यशस्वी व्हा!;प.पू. प्रमोदमुनिजी म.सा.

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/05/2026
in जळगाव
Reading Time: 1 min read

प.पू. आचार्य भगवंत १००८ श्री हिराचंद्रजी म.सा. भावी आचार्य प.पू. महेंद्र मुनी जी म. सा. यांचे अज्ञानुवर्ती तत्त्वचिंतक प.पू. प्रमोदमुनी जी आदिठाणा ३, महासतीजी प.पू. विमलेशप्रभाजी म.सा. आदि ठाणा ११ यांचा वाकोद विहार झाला. यावेळी वाकोद जैन फार्म येथे सुख सातापूर्वक विराजमान झाले. यावेळी प.पू.प्रमोद मुनी यांच्या प्रवचनाचा लाभ श्रावक श्राविकांनी घेतला. यावेळी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, माजी महापौर प्रदीप रायसोनी, अतुल जैन, सौ. ज्योती जैन, नयनतारा बाफना, अभय जैन, अविनाश जैन, सुरेश जैन, नगरसेवक अमर जैन, सचेत जैन, नंदलाल गादीया, सुनील जैन, रुपेश लुंकड, नितीन चोपडा, संदीप रेदासनी, रमण छाजेड, गणेश कर्नावट, नरेंद्र जैन, यांच्यासह जळगाव येथून ४० हून अधिक श्रावक-श्राविका उपस्थित होते. यावेळी प.पू. प्रमोदमुनी यांचे मंगल प्रवचन झाले. आध्यात्मिक वा व्यक्तीगत जीवनात यशस्वी होण्यासाठी सेवा, त्याग आणि प्रेम ही त्रीसुत्री उपयोगी पडते. ‘शांती’ प्राप्त करण्यासाठी साधना आवश्यक असते. हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मात ‘शांती’ या शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येकाने साधना करून आपली आध्यात्मिक उन्नती साध्य करावी असे आवाहन आपल्या प्रवचनातून केले.

क्रोध हे प्रीतीला, मान विनयला, माया मित्रतेला तर लोभ हा सर्व नाशाचे कारण ठरतो. सगळ्या अनर्थाला या चार गोष्टी कारणीभूत ठरतात. हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी दोन भावांची गोष्ट उपस्थितांना सांगितली. आपल्या अंतरी असलेल्या दोषांना हटवून गुणांना अभिव्यक्त करतात तो खरा धर्म असतो अशी अत्यंत सोपी व्याख्या त्यांनी उपस्थितांना स्पष्ट करून सांगितली. आपल्या हृदयात गुणांना जपणे हिच खरी आवश्यकता आजच्य परिस्थिती साठी योग्य आहे. आपल्यातले गुण वाढवा, कमीत कमी उपभोग घ्या आणि त्याग करायला सुरवात करू या असे आवाहन प्रवचनातून करण्यात आले. भवरलाल कांताबाई जैन फार्म परिवारा तर्फे नितीन चोपडा यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन महावीर गोलेच्छा केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी विनोदसिंह राजपूत, मुकेश संचेती, भीमराव दांडगे, गोविंद थोरवे आदींनी परिश्रम घेतले. वाकोद श्री श्रावक संघ, त्रिशला महिला मंडळ, नवयुवक मंडळ यांनी सहकार्य केले. उपस्थित संताचे वाकोद येथून 6 मे रोजी पहूर च्या दिशेने सकाळी प्रस्थान होणार आहे. पहूर येथे आगमन होईल. समाज बांधवानी प्रवचनाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ऑटोरिक्षा व मिटर टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा– प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे आवाहन

Next Post

अंगारकी चतुर्थीनिमित्त पद्मालय येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा

Next Post
अंगारकी चतुर्थीनिमित्त पद्मालय येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा

अंगारकी चतुर्थीनिमित्त पद्मालय येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo