Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्पेनच्या राजदूतांनी घेतली राज्यपालांची भेट; शैक्षणिक व सांस्कृतिक सहकार्य, पर्यटन वाढविण्याबाबत चर्चा

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
29/11/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
स्पेनच्या राजदूतांनी घेतली राज्यपालांची भेट; शैक्षणिक व सांस्कृतिक सहकार्य, पर्यटन वाढविण्याबाबत चर्चा

मुंबई(प्रतिनिधी)- स्पेनचे भारतातील नवनियुक्त राजदूत जोस मारिया रिदाओ डॉमिन्गेझ यांनी सोमवारी (दि. २९) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली.स्पेन आणि भारतामध्ये व्यापारासह शैक्षणिक, सांस्कृतिक व पर्यटन क्षेत्रात सहकार्य वाढविण्याबद्दल आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

जगभरात स्पॅनिश भाषा बोलणाऱ्यांची संख्या ५०० दशलक्ष इतकी असून भारतात देखील स्पॅनिश भाषा शिकण्याकडे युवकांचा कल वाढत असल्याचे जोस मारिया यांनी सांगितले. स्पेनमध्ये मोठा भारतीय समुदाय असून भारतातून स्पेनमध्ये अधिक पर्यटक यावे तसेच स्पेनमधून देखील भारतात अधिक पर्यटक यावे यासाठी आपण प्रयत्न करू असे राजदूतांनी सांगितले.

महाराष्ट्रात अजिंठा वेरूळ लेणी यांसह अनेक जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे असून स्पॅनिश पर्यटकांना महाराष्ट्रात येऊन खचितच आनंद होईल असे राज्यपालांनी सांगितले. मात्र त्या दृष्टीने मुंबई – माद्रिद थेट विमानसेवा सुरु झाल्यास पर्यटनाला अधिक चालना मिळेल असे त्यांनी सांगितले.यावेळी स्पेनचे मुंबईतील वाणिज्यदूत फर्नांडो हेरेडिया उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Previous Post

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण

Next Post

जलसंवर्धन योजनेतून ७ हजारांहून अधिक प्रकल्पांची दुरुस्ती; १ हजार ३४१ कोटी रुपयांचा आराखडा तयार

Next Post
जलसंवर्धन योजनेतून ७ हजारांहून अधिक प्रकल्पांची दुरुस्ती; १ हजार ३४१ कोटी रुपयांचा आराखडा तयार

जलसंवर्धन योजनेतून ७ हजारांहून अधिक प्रकल्पांची दुरुस्ती; १ हजार ३४१ कोटी रुपयांचा आराखडा तयार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo