Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्वाती सोमाणी यांच्या ‘सोनेरी काठपदर’ पुस्तकाचे प्रकाशन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/02/2020
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
स्वाती सोमाणी यांच्या ‘सोनेरी काठपदर’ पुस्तकाचे प्रकाशन

सोमाणी दाम्पत्यांकडून प्रतिकूल परिस्थितीत जगणे शिकविण्यासारखे – अशोकजी तापडीया

जळगाव दि. 2 (प्रतिनिधी) – प्रतिकूल परिस्थितीत कसे जगावे याचा परिपाठ सोनेरी काठपदर या पुस्तकात वाचावयास मिळतो. ज्यांच्यावर हे पुस्तक लिहिले गेले त्या सोमाणी दाम्पत्याकडून प्रतिकूल परिस्थितीत कसे जगावे हे नव्या पिढीला शिकण्यासारखे आहे असे भावपूर्ण उद्गार अशोकजी तापडीया (नाशिक) यांनी व्यक्त केले. येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती स्वाती सोमाणी लिखीत व किशोर कुळकर्णी संपादीत ‘सोनेरी काठपदर’ या पुस्तकाचे प्रकाशन 1 फेब्रुवारी 2020 रोजी दुपारी 4 वाजता डिमार्ट येथील अगस्ती अपार्टमेंट, आदर्श नगर जळगांव येथे पार पडले त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सारडा व सोमाणी परिवाराचे सदस्य उपस्थित होते. आरंभी चिंतामणी नांदेडकर यांनी आपल्या प्रास्ताविकात अरुण सोमाणी यांच्या आठवणींना उजाळा दिला. लेखिका स्वाती सोमाणी, पुस्तकाचे संपादन करणारे किशोर कुळकर्णी, श्रीमती भारती कुळकर्णी यांचे देखील यावेळी यथोचित भाषण झाले.  शहरातील सुप्रसिद्ध अशा ओरियंट सिमेंटचे सेवानिवृत्त महाव्यवस्थापक स्व. अरुण सोमाणी व सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती स्वाती सोमाणी यांच्या जीवनावर आधारीत हे पुस्तक आहे. प्रकाशन क्षेत्रात नावाजलेल्या जळगाव येथील कृपा प्रकाशनने प्रकाशित केले आहे. सोनेरी काठपदर या पुस्तकाचे मुखपृष्ठ सुप्रसिद्ध कलाकार मीलन भामरे यांनी साकारले आहे. प्रतिकूल आरोग्य असून देखील त्यावर खंबीरपणे सकारात्मक दृष्टीकोन ठेवत केलेली मात.  पती-पत्नीचा प्रेरणादायी जीवन संघर्ष सहज सोप्या पद्धतीने शब्दबद्ध केला आहे. सोमाणी दाम्पत्याच्या या पुस्तकातुन नव्या पिढीला शिकण्यासारखे, प्रेरक असे उत्तम साहित्य वाचायला मिळेल. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका भूषण मालाणी (औरंगाबाद ) यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा

Next Post

“समाज चिंतामणी प्रतिष्ठान” आयोजीत “साहित्य कट्टयावर रंगली चर्चा”

Next Post

"समाज चिंतामणी प्रतिष्ठान" आयोजीत "साहित्य कट्टयावर रंगली चर्चा"

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo