जळगाव, दिनांक २३ जून : जळगाव जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, वीर माता, वीर पिता, वीर पत्नी तसेच अवलंबित यांच्या अडिअडचणी सोडविण्यासाठी ३० जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता स्टेशन हेडक्वार्टर, भुसावळ येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्यास Army Placement Node, Pune, PCDA Allahabad, Records ARMD Corps, Records MAHAR Regiment, Records MIRC, Records The Maratha Light Infantry Regiment, EME Records, Records The Mech Infantry Regiment Signal Records, MEG Records, BEG Records, Arty Records यांसह CPPC स्टेट बँक ऑफ इंडिया, CPPC पंजाब नॅशनल बँक, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय जळगाव व बुलडाणा येथील अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

तरी मेळाव्यात संबंधित माजी सैनिक, वीर माता, वीर पिता, वीर पत्नी तसेच अवलंबित यांनी आपल्या अडिअडचणींचे निवेदन छायांकित तीन प्रतींसह घेऊन ३० जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता स्टेशन हेडक्वार्टर, भुसावळ येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.










