<
जळगाव, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) – शिकाऊ उमेदवार अधिनियम अंतर्गत शिकाऊ उमेदवारांची आस्थापनेत भरती, प्रशिक्षण व परीक्षेसंबंधी कामकाज यापूर्वी शासनाच्या www.apprenticeship.gov.in या पोर्टलवरु चालत होते. आता त्यात शासनाने बदल केला असून नवीन पोर्टल www.apprenticeship.org.in याप्रमाणे आहे.
यापुढे सर्व उमेदवारांनी भरती, प्रशिक्षण व परिक्षेसंदर्भातील माहितीसाठी या नवीन पोर्टलचाच उपयोग करावा. यापुर्वी नोंदणी झालेल्या सर्व आस्थापना व शिकाऊ उमेदवारांना मात्र नवीन पोर्टलवर पुन्हा नव्याने नोंद करण्याची आवश्यकता नाही. त्या सर्व उमेदवारांची नोंदणीसंदर्भातील सर्व माहिती नवीन पोर्टलवर स्थलांतरीत (ट्रॉन्सपर) झालेली आहे. नवीन पोर्टलवर लॉग इन करताना कंपनीने ई-मेल हा आयडी म्हणून वापरावयाचा असून पासवर्ड मध्ये मात्र बदल करून घेण्याची दक्षता घ्यावी.
अधिक माहितीसाठी बीटीआरआय कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन अंशकालीन प्राचार्य, मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगीक सूचना केंद्र, द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.