<
विविध विकास कामांचे भूमिपूजन -गुणवंतांचा झाला गौरव
जळगांव (प्रतिनिधी)दि.२ -जळके येथिल पाणीपुरवठा योजनेचे काम पुढील महिन्यापासून सुरू करणार असून तांडा वस्तीत विकास कामांसाठी कटिबद्ध आहे. प्रत्येक पालकांनी मुलांच्या शिक्षणासाठी काळजी घेण्याची नितांत गरज असून विद्यार्थ्यांनी ध्येय डोळ्यासमोर ठेवल्यास यश निश्चित प्राप्त होते. विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार म्हणजे गावाचा सन्मान असतो. असे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री तथा शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील यांनी केले. वसंतवाडी येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन व गुणवंतांच्या सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा संघटक ज्ञानेश्वर महाराज हे होते.
१ कोटीच्या वर विविध विकास कामांचे भूमिपूजन
यावेळी राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जळके येथिल पुलाचे बांधकाम करणे (९० लक्ष),जळके व वसंतवाडी येथिल मंदिर परिसरात व गावांत काँक्रीटीकरण, रामदेवजी बाबा मंदिराच्या आवारात रंगमंच बांधकाम अश्या एकूण १ कोटी २५ लक्ष निधीतील कामांचे भूमिपूजन ना.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
ना. पाटील यांच्या हस्ते ११ महिलांना धनादेश वाटप
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेत एकरकमी २० हजारांचा अर्थसहाय्याचा धनादेश दिला जातो. या अंतर्गत शिवसेनेचे उपनेते ना. गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार व केलेल्या पाठपुराव्या नुसार जळगाव तालुक्यातील ११ महिलांना प्रत्येकी २० हजार या प्रमाणे एकूण २ लक्ष २० हजाराचे प्रस्ताव मंजूर असून सदर धनादेश राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. यात यशोदाबाई चव्हाण, (वसंतवाडी), छायाबाई खैरे ( वावडदा ), बेबाबाई नेरकर (वसंतवाडी), विमलबाई पाटील (जवखेडा) , मंगलाबाई गोपाळ (धानवड), सरस्वती जाधव (कंडारी), संगीता सपकाळे (आव्हाणे ), छाया सपकाळे (फुपनी ), सिंधुबाई सपकाळे (विदगाव ),सुमन नरवाडे (भादली बु) व अंजनाबाई मराठे (बोरणार)यातील प्रातिनिधिक स्वरूपात काहींना सहकार राज्यमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते धनादेश देण्यात आले.
लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप* जळके व वसंतवाडी परीसरातील संजय गांधी निराधार योजनेच्या ३६ लाभार्थ्यांना तसेच पंतप्रधान आयुष्यमान योजनेअंतर्गत २४ लाभार्थ्यांना प्रमापत्रांचे वाटपही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच परिसरातील विद्यार्थ्यांना डोमोसाईल (अधिवास दाखले) मोफत वाटप करण्यात आले.
गुणवंतांचा झाला गौरव
जळके , वसंतवाडी व परिसरातील १० वी व १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र ,शाल व श्रीफळ देऊन राज्यमंत्री गुलाबराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात १२ वीचे ११ विद्यार्थी तर १० वीचे ९ विद्यार्थी तसेच सीईटी मध्ये मेरिट मध्ये आलेल्या ३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
तसेच जामनेर येथिल राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त केंद्र प्रमुख संजय पाटील यांची ग. स. च्या तज्ज्ञ संचालक पदी निवड झाल्याबद्दल तर वावडद्याचे सुमित पाटील यांनी आतापर्यंत १ हजाराच्यावर विवाह जुळवल्या बद्दल ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच दिपक पाटील यांना समाजभूषण व उत्कृष्ट पत्रकारितेच्या सन्मानार्थ आणि शिवसेनेच्या व युवासेनेचे नवनिर्वाचित तालुका स्तरावरील व म्हासावद – बोरणार जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
सरपंचांना ओळ्खपत्रांचे वाटप
राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार पंचायत समिती मार्फत जळगांव तालुक्यातील ७० ग्रामपंचायत सरपंचांना ओळखपत्र तयार करण्यात आले होते. या प्रसंगी वडली सरपंच सचिन पाटील,वसंतवाडी सरपंच वत्सलाबाई पाटील,पाथरी सरपंच रवी चौधरी सर, जळके सरपंच सुमनबाई मोरे यांच्यासह परिसरातील सरपंचांना राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच या प्रसंगी जळके व वसंतवाडी या गावासाठी ना.पाटील यांच्या सूचनेनुसार कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फ़त शव पेटीचे लोकपर्ण करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे,जिल्हा संघटक ज्ञानेश्वर महाराज, उपजिल्हा संघटक नाना सोनवणे ,पं स सदस्य नंदलाल पाटील , सं.गो .योजनेचे सदस्य रमेश पाटील,तालुका संघटक संजय घुगे, चावदस कोळी, उपतालुका प्रमुख धोंडू जगताप , वसंतवाडी सरपंच वत्सलाबाई पाटील,जळके सरपंच सुमनबाई मोरे , उपसरपंच गजमल पवार,ज्ञानेश्वर चव्हाण,सिताराम पवार, रघु काठेवाडी, पी. के. पाटील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्रेणी १ चे सुभाष राऊत, शाखा अभियंता जे .के.महाजन, आर. जी. बेडिस्कर व ग्रामस्थ महिला मोठ्या उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य रमेश आप्पा पाटील यांनी केले तर आभार विभाग संघटक पी. के. पाटील यांनी मानले.