<
जळगांव(प्रतिनिधी)- तालुक्यातील वडली ग्रामपंचायती कडून कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी गावातील सर्व नागरिकांना मास्क व सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले. कोरोना विषाणूचा वाढता आलेख पाहता सुरक्षतेच्या दृष्टीने ग्राम कोरोना नियंत्रण समितीच्या निर्णयानुसार गावातील सर्व अंतर्गत रस्ते बंद करण्यात आले. गावातील सर्व नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन ग्रामपंचायती कडून करण्यात आले आहे. यावेळी ग्रामसेवक डी.डी.इंगळे, पोलीस पाटील दिलीप पाटील, ग्रा.पं. शिपाई बापू पाटील, आशा वर्कर स्वाती पाटील आदी सोशल डिस्टन्सीगं ठेवून उपस्थित होते.