<
जळगांव- (चेतन निंबोळकर)- तालुक्यातील पाळधी येथील नोबल इंटरनॅशनल स्कूल येथे दिनांक ५ आँगस्ट सोमवार रोजी १ली ते ४थी च्या विद्यार्थांनी शाळेच्या चेअरमन सौ.अर्चना सुर्यवंशी यांच्या संकल्पनेतून विद्यार्थांनी फ्रेंडशिप डे(मैत्री दिवस) एका अनोख्या पद्धतीने साजरा केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री. प्रशांत सुर्यवंशी सर व मुख्याध्यापक श्री. योगेश करंदीकर यांनी विद्येची देवता माता सरस्वती सह श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करून विद्यार्थ्यांना मैत्रीचे महत्त्व समजावून सांगितले. त्यासह निसर्गाचे संतुलन राखून वृक्ष कशाप्रकारे आपली मदत करतात आणि आपले खरे मित्र वृक्षच आहेत, असे सउदाहरण दिले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी “ग्रिन डे” निमीत्त लावलेल्या सर्व ५० झाडांना फ्रेंडशिप बँड बांधून व त्यांना पाणी घालून त्यांच्या संवर्धनाची शपथ घेतली आणि निसर्गाच्या व आपल्या मानवजातीच्या खऱ्या मित्रांसोबत मैत्री दिवस साजरा केला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. योगेश करंदीकर यांच्यासह प्रशांत सुर्यवंशी सर, उज्ज्वला झंवर, विजया मोरे, सोनल कुंभार, गुणवंत पवार, सतीश पाटील यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आश्विनी ठाकरे यांनी केले.