<
जळगाव – आयुष्यभर क्षणाक्षणाची संगत म्हणजे मैत्री , सुखदुःखात एकत्र भिजलेली नाती म्हणजे मैत्री असा हा मैत्री दिन केसीई सोसायटी च्या गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्यासोबत आणलेले रंगीबेरंगी फ्रेंडशिप बँड एकमेकांना बांधून शुभेच्छा दिल्या.आम्ही नेहमी एकमेकांना सहकार्य करू. अडचणीमध्ये मदत करू.आनंदात सहभागी होऊ तसेच एकमेकांचे दुःख सुद्धा वाटून घेऊ अशी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा केली.
मैत्रिदिन भारतामध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पेरुग्वे मध्ये सुरू झालेला हा मैत्रिदिन संपूर्ण जगात वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी मित्र मैत्रिणी रंगीत धागे बांधून ,एकमेकांना पुष्पगुच्छ देऊन व भेटवस्तू देऊन आपली मैत्री चिरंतन राहो अशा सदिच्छा व्यक्त करतात.म्हणून आपण सर्वांनी एकमेकांशी निस्वार्थपणे वागून आपल्या मैत्रीची ओळख करून दिली पाहिजे.अशा शब्दात उपशिक्षक योगेश भालेराव यांनी मैत्रिदिनाविषयी माहिती दिली.कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्या.रेखा पाटील यांनी मार्गदर्शन केले तर उपशिक्षक योगेश भालेराव व सुधीर वाणी यांनी परिश्रम घेतले.