<
मुंबई – सुशीलकुमार सावळे
आज भारत देशामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा झपाट्याने वाढत आहे. गेल्या महिनाभरापेक्षा जास्त कालावधीपासून देशात लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वच बंद करण्यात आले आहे. शाळा महाविद्यालये सुद्धा बंदच आहेत. ऐन परीक्षेच्या तोंडावर हा लॉकडाऊन झाला असल्याने परीक्षांच्या बाबतीत विद्यार्थी व पालक हे चिंताग्रस्त होते. त्याच पार्श्ववभूमीवर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी व पालकांशी आज संवाद साधला व उच्च व तंत्र शिक्षण विभागातील परीक्षांबाबत शासकीय निर्देश दिले =
१. अंतिम वर्षातील अंतिम सत्राची परीक्षा सोडून बाकीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता मागील परफॉर्मन्स लक्षात घेऊन पुढील वर्गात प्रवेश देण्यात यावा.
२. हा निर्णय घेत असताना मागील वर्षातील व सध्याचा परफॉर्मन्स लक्षात घेऊन दोन्ही लक्षात घेऊनच विद्यार्थ्यांना मार्क दिले जातील व विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पाठवण्यात येईल.
३. विद्यार्थ्यांना पुढील वर्गामध्ये गेल्यानंतर जर महाविद्यालय किंवा विविद्यापीठाने दिलेले मार्क जर कमी वाटतं असतील तर विद्यार्थ्यांना ऐच्छिक परीक्षा देण्याची मुभा असेल. त्याचे व्यवस्थपन त्या त्या विद्यापीठाने करावे. जर विद्यार्थी या परीक्षांमध्ये नापास झाले तर त्यांना पुढील वर्षांमध्ये जाण्यास मुभा असेल पण त्यांना ती परीक्षा द्यवीच लागेल.
४. मुंबई विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठ यामध्ये झालेल्या परीक्षांमध्ये त्यांनी मिळवलेले गुन व ग्रेड पद्दतीने दिले गेलेले मार्क्स यामध्ये तुलनात्मक ज्याचे मार्क्स जास्त असतील तेच ग्राह्य धरले जातील.
५. ज्या विद्यार्थ्यांना ATKT लागलेली आहे त्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गामध्ये प्रवेश दिला जाईल पण त्या विद्यार्थ्यांना ATKT असलेल्या विशयनमधील परीक्षा द्यावी लागणार आहे. सादर विद्यापीठाने नवीन वर्ष चालू होताच १२० दिवसांमध्ये त्या परीक्षा घेणे बंधनकारक राहील.
६. अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रातील परीक्षा या युजीसी च्या निर्देशाप्रमाणे १ जुलै ते ३० जुलै या दरम्यान घेण्यात येतील. पण कोरोनाचा प्रादुर्भाव जर वाढत असेल आणि लॉकडाऊन वाढवण्यात आले तर २० ते २५ जून च्या दरम्यान punha एकदा समितीने, राज्यशासनाने व कुलगुरूंनी मिळून योग्य तो निर्णय घ्यावा.
७. अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचे भवितव्य हे अंतिम परीक्षांवर अवलंबन असते त्यामुळे सादर परीक्षा घेण्याची तसदी राज्यशासनामार्फत घेण्यात येत आहे.
८. सेमिस्टर पॅटर्न असल्यास फक्त अंतिम सत्राची परीक्षा घेतली जाणार आहे व वार्षिक अभ्यासक्रम असल्यास वार्षिक परीक्षा घेतली जाणार आहे.
९. बारावीचा निकाल जाहीर झाल्यांनतर सीईटी व जेईई च्या परीक्षा घेण्याबाबत निर्णय घेण्यात येतील.
१०. SNDT विद्यापीठच्या राज्यातील परीक्षा या राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे घेण्यात येतील व इतर राज्यात असणाऱ्या विद्यापीठाच्या परीक्षा या संबंधित राज्यातील निर्देशाप्रमाणे घेण्यात येतील.
११. गडचिरोली आणि चंद्रपूर या ग्रीन झोन जिल्ह्यांमधील परीक्षा विद्यापीठाने वेळापत्रक तयार करून आयोजित कराव्यात.
१२. अटेन्डन्स च्या बाबतीत सुद्धा सूट देण्यात आली आहे. लॉकडाऊन कालावधीमधील ४५ दिवस विद्यार्थी हजर होते अशी नोंद करावी व ४५ दिवस ऍड करूनही उपस्थिती पूर्ण होत नसल्यास विद्यापीठाने संवेदनशील विचार करून कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याबद्द्ल काळजी घ्यावी.
१३. ऑटोनॉमस विद्यापीठांना सुद्धा राज्य शासनाच्या निर्देशानुसारच परीक्षा आयोजित करण्यात याव्यात.
राज्यभरात सर्व विद्यापीठ मिळून एकूण ३३ ते ३४ लक्ष एवढे विद्यार्थी हे परीक्षेसाठी होते त्यातून अंतिम सत्रात ८ ते ९ लाख विद्यार्थी आहेत व इतर वर्षातील २५ ते २६ लक्ष एवढे विद्यार्थी आहेत. सोशल डिस्टंसिंग चे भान ठेऊनच परीक्षा घेतल्या जातील. प्रॅक्टिकल परीक्षा फिजिकल न घेता ओंलीने पद्दतीने घेण्यात जावेत. पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या समस्या निराकरण कारण्यासाठगी विद्यापिठ की कुलगुरू यांनी जिल्हा स्तरावर सेल तयार करण्यात यावे. असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांनी दिले आहेत.
Medical physiotherapy exam Che ky
अद्याप pending आहे