Sunday, August 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

परिवहन महामंडळाची विभागीय व आगार कार्यशाळेचे कामकाज करण्यासाठी सकाळी 8.30 ते 17.30 या वेळेमध्ये अटी व शर्तीच्या आधीन राहून परवानगी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
   उस्मानाबाद, दि. 8 (जिमाका) :- महाराष्ट्र शासनाने कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचा कालावधी दिनांक 17 मे 2020 पर्यंत वाढविला आहे. या लॉकडाऊनच्या कालावधीत करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्यातील मुद्दा क्रमांक 9 (iii) नुसार ग्रीन झोनमध्ये बस डेपो 50 टक्के इतक्या क्षमतेने  सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.
      विभाग नियंत्रक, राज्य परिवहरन, उस्मानाबाद यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ उस्मानाबाद विभागातील विभागीय कार्यशाळा व आगार कार्यशाळा येथील कामकाज सकाळी 8.30 ते 17.30 या वेळेमध्ये सुरु करण्यासाठी परवानगी मिळणे बाबत विनंती केली आहे.
      त्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा दीपा मुधोळ-मुंडे यांना प्राप्त अधिकारांनुसार कोरोना  विषाणू (COVID-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या कालावधीत दि. 17 मे, 2020 पर्यंत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ   

उस्मानाबाद विभागातील विभागीय कार्यशाळा व आगार कार्यशाळा येथील कामकाज सकाळी 8.30 ते 17.30 या वेळेमध्ये सुरु करण्यासाठी खालील अटी व शर्तीच्या आधीन राहून परवानगी दिली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आदेशातील मुद्दा क्रमांक 9 (iii) नुसार विभागीय कार्यशाळा व आगार कार्यशाळा 50 टक्के क्षमतेने सुरु करता येतील. कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने तयार केलेली प्रामाणिक कार्यपद्धती (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील. कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक उपस्थिती न नोंदविता हजेरीपटावर उपस्थिती घेण्यात यावी. विभागीय कार्यशाळा व आगार कार्यशाळा येथे वारंवार स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्यात यावे. तसेच आरोग्य विभागाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार सामाजिक अंतराचे पालन करण्यात यावे. उपस्थित कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक स्वच्छता राखणे, मास्क, ग्लोव्हज, गॉगल्स, सॅनिटायझर यांचा वापर करणे बंधनकारक असेल. कर्मचाऱ्यांना त्यांचे हाताने त्यांचे नाक, तोंड व डोळ्यांना स्पर्ध न करण्याबाबत सूचना करावे. शासनाकडून तसेच आरोग्य विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील. तसेच महाव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, यंत्र अभियांत्रिकी खाते, मुंबई यांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात यावे.
या आदेशाची अंमलबजावणी आदेशाच्या दिनांकापासून तात्काळ लागू करण्यात येत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

उस्मानाबाद जिल्ह्यातील महामार्गावरील व राज्य मार्गावरील धाबे अटी व शर्थीच्या आधारे चालू करण्यास परवानगी

Next Post

नवीमुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व भवनांचे विलगीकरण कक्षात रूपांतर करा- प्रवीण खेडकर

Next Post
नवीमुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व भवनांचे विलगीकरण कक्षात रूपांतर करा- प्रवीण खेडकर

नवीमुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व भवनांचे विलगीकरण कक्षात रूपांतर करा- प्रवीण खेडकर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo