उस्मानाबाद(जिमाका):- महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 नियम क्र.3 नुसार करोना विषाणुमुळे (COVID-19) उद्ववलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी जिल्हाधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रात सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहेत. महाराष्ट्र शासनाने कोविड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचा कालावधी दि.17 मे 2020 पर्यंत वाढविला आहे व लॉकडाऊनच्या कालावधीत करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत.यातील मुद्दा क्र.2 (i)नुसार ग्रीन,ऑरेज व रेड (हॉटस्पॉट)झोनबाबत स्पष्टीकरण करण्यात आले आहे.तसेच मुद्दा क्र.(ii)नुसार करोना (COVID-19) चा प्रादुर्भाव विचारात घेऊन जिल्हयातील रेड झोन (हॉटस्पॉट) व ऑरेज झोन चा भाग निश्चित करणेबाबत अधिकार देण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासन महसूल व वने आपत्तीव्यवस्थापन व्यवस्थापन आधिसुचना मधील मुद्दा क्र.8 (i) नुसार ऑरेज झोनमध्ये जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बस वाहतूकीस प्रतिबंध करण्यात आला असून उस्मानाबाद जिल्हयातील परंडा तालुक्यामध्ये करोना विषाणू (COVID-19) चा रुग्ण आढळून आलेला असल्यामुळे,करोना विषाणू (COVID-19) चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रतिबंधात्मक उपायोजना एक भाग म्हणून यापूर्वी उस्मानाबाद जिल्हांतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस सेवा सुरु करण्याकरिता देण्यात आलेली परवानगी रद्द करणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दीपा मुधोळ मुंडे यांनी करोना विषाणु (COVID-19) चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता लॉकडाऊनच्या कालावधीत दि.17 मे 2020 पर्यंत उस्मानाबाद जिल्हांतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस सेवा बंद करणेबाबत आदेशित केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना आपत्ती व्यवस्थापना अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच महाराष्ट्र कोविड-19 उपायोजना नियम-2020 चे नियम 11 नुसार, भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदीनुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस पात्र राहील. या आदेशाची अंमलबजावणी आदेशाच्या दिनांकापासून तात्काळ लागू करण्यात येत आहे.