कळंब, प्रतिनिधी | हर्षवर्धन मडके
कळंब तालुक्यातील मोहा गावचे सरपंच राजू झोरी सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर आहेत. किराणा किट चे वाटप असो, पाणी पुरवठा असो, किंवा शालेय साहित्य वाटप असो . कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरपंच राजू झोरी यांनी पुढाकार घेत स्वखर्चातून ५०० मास्क चे आदिवासी लोकांना वाटप केले. आणि पुन्हा एकदा सामाजिक कार्यात रुची असल्याचे झोरी यांनी सिद्ध केले. तसेच डिजिटल सखी प्रकल्प अंतर्गत महिला, आशा आणि महिला बचत गटाने कोणतेही शुल्क न घेता मास्क चे मोफत शिवण काम करून दिले, या सर्वांनी घेतलेल्या पुढाकाराने निश्चितच कोरोनाला हद्दपार करण्यास मदत मिळेल.
कोरोना पार्श्वभूमीवर डिजिटल सखी प्रकल्प अंतर्गत महिला, महिला बचत गट, आशा, अंगणवाडी कार्यकर्ती यांनी भरपूर मेहनत घेतली आहे. तसेच युद्धपातळीवर घरोघरी जाऊन मोफत सँनिटायझरचे वाटप सुरू आहे.
आदिवासी लोकांना मोफत ५०० मास्क चे वाटप करताना यावेळी मोहाचे सरपंच राजू झोरी, तंटामुक्ती उपाध्यक्ष अंकुश मडके, पोलिस पाटील प्रकाश गोरे, ग्राम पंचायत कर्मचारी सुदर्शन मडके तसेच डिजिटल सखी प्रकल्प अंतर्गत महिला, महिला बचत गट, आशा, अंगणवाडी कार्यकर्ती उपस्थित होत्या.