<
उस्मानाबाद :- जिल्हा सामान्य रुग्णालय मार्फत दिनांक 25 मे 2020 रोजी लातूर येथील प्रयोगशाळेत पाठवलेल्या अहवाला मधील प्रलंबित असलेल्या पाच अहवालांमधून तीन व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून दोन व्यक्तीचे अहवाल अनिर्णीत आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे.
पॉझिटिव्ह आलेल्या तीन व्यक्ती पैकी एक उस्मानाबाद शहरातील पापनाश नगर चा रुग्ण असून तो मुंबई येथून प्रवास करून आलेला आहे. दुसरा तेर येथील रुग्ण असून तो पुणे येथून प्रवास करून आलेला आहे. तर तिसरा पॉझिटिव्ह रुग्ण हा कळंब तालुक्यातील शिराढोण येथील यापूर्वीच्या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेला आहे, असे डॉक्टर सतीश आदटराव व जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर गलांडे यांनी कळविले आहे.
तसेच जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ३८ झाली असून ८ जण ठीक होऊन घरी परतले आहेत तर ३० जणांवर उपचार सुरू आहेत.