Wednesday, July 9, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बचत गटांचे ‘मास्क’ देताहेत सुरक्षित श्वास!

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
बचत गटांचे ‘मास्क’ देताहेत सुरक्षित श्वास!

कोरोना संकटात जिल्ह्यात ४ लाख ३६ हजार मास्कची निर्मिती; महिला बचत गटांना मिळाले ४२ लाख ५५ हजारांचे उत्पन्न

नाशिक, दि.27 – दर उन्हाळ्यात वाळवणाच्या पदार्थांतून लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या बचतगटांपुढे यंदा कोरोना महामारीच्या संकटाने मोठा पेच निर्माण केला होता. मात्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी ‘आपत्तीतून इष्टापत्ती’ साधत या बचतगटांतील महिलांमध्ये आत्मविश्वास  निर्माण करून मास्क निर्मितीचा मंत्र दिला आणि पाहता पाहता या लघुउद्योगाने  संपूर्ण जिल्ह्याला एक प्रकारे कोरोनाशी लढण्यासाठी  ‘सुरक्षा कवच’च  तयार करून दिले. आज जिल्ह्यातील २५३ बचत गटांनी तब्बल ४ लाख ३६ हजार मास्क निर्मिती केली असून, त्यापैकी ४ लाख ३३ हजार मास्कची विक्री केली आहे. त्यातून तब्बल ४२ लाख ५५ हजाराचे उत्पन्न मिळाले आहे. 

Maha Info Corona Website

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने २५ मार्च २०२० रोजी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केले. या लॉकडाऊनमुळे शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील अनेकांचे रोजगार गेले. उन्हाळ्यात वाळवणं तयार करुन लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या बचतगटाच्या हाताचेही काम गेले. गटातील महिलांचाही उपजीविकेचा प्रश्न उभ राहिला. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी  या बचत गटांना ग्रामस्तरावर मोठ्या प्रमाणावर मास्क तयार करून त्याची विक्री करावी, असे आवाहन करून बचतगटाच्या काम करणाऱ्या महिलांमध्ये एक ऊर्जा निर्माण केली. जिल्ह्यातील २५३ बचतगटांनी लीना बनसोडे मॅडमच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आजपर्यंत ४ लाख ३३ हजार मास्कची विक्री करून ४२ लाख ५५ हजाराचे उत्पन्न मिळाले आहे.

मास्क निर्मितीतून बचतगटांनी मोठे काम उभे केले

बचत गटांच्या चळवळीवर आणि त्यांच्या कामावर माझा पूर्ण विश्वास आहे. गेल्या १२ वर्षांपासून मी या बचत गटांचे काम खूप जवळून पाहिले आहे. त्यात सहभाग घेतला आहे. करोना संकटसमयी मला खात्री होती की, बचत गटांच्या माध्यमातून आपण खूप मोठे काम उभे करू शकतो. आमच्या आवाहनाला महिलांनीही प्रतिसाद दिला. त्यांच्या हातांनाही काम मिळाले, रोजगार मिळाला. खास करून त्यांचा आत्मविश्वासही वाढला.  – लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

सामाजिक बांधिलकीतून उपजिविका : 

कोरोनाच्या संसर्गापासून बचावासाठी मास्क गरजेचा आहे. आज घराबाहेर पडणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावर दिसतो. मात्र मास्क वापराची जनजागृती करीत असताना जाणविले की ग्रामस्तरावर मास्कचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. त्यामुळे तालुकास्तरावरुन बचत गटांना मास्क तयार करण्याचे काम देऊन त्यांची उपजीविका साधण्याचा सुवर्णमध्य जिल्हा परिषदेने साधला. 

प्रबोधन करणाऱ्या वर्गाला मास्कची आवश्यकता :

कोरोनापासून बचाव कसा करावा याबाबत प्रबोधन करण्यासाठी जिल्ह्यात साडेतीन हजार आशा, ७३९ आरोग्य सेविका, ३२८ आरोग्य सेविका व ९ हजार १०६ अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. या सर्वांना मास्क अत्यंत गरजेचे असल्याने स्वयंसहायता समूह बचत गटांकडून मास्क तयार करण्यात आले व बचतगटांनी देखील चांगला प्रतिसाद दिला.

तालुकानिहाय मास्कची विक्री व उत्पन्न :

जिल्ह्यातील १५ तालुक्यामध्ये निफाड तालुका अग्रेसर असून, या तालुक्यातील केवळ ११ बचतगटांनी ९३ हजार ८९० मास्कची विक्री करून ३ लाख ४४ हजार रुपये उत्पन्न मिळविले आहे. या तालुक्याचे आमदार दिलीप बनकर यांनी बचतगटांना कापड व दोरा उपलब्ध करून त्यांना आवश्यक तो मोबदला दिला. तसेच नाशिक तालुक्यातील बचत गट उत्पन्न मिळविण्यात अग्रेसर असून,  २४ बचतगटांनी  ५७ हजार मास्कची विक्री करून त्यातून ६ लाख ७९ हजार एवढे उत्पन्न मिळविले आहे. चांदवड तालुक्यात ८० हजार ३५० मास्कची विक्री झाली असून, त्याद्वारे ३ लाख ७८ हजाराचे उत्पन्न मिळविले आहे. बागलाण तालुक्यात २७ हजार मास्कची विक्री झाली करून त्यातून तीन लाख ५० हजाराचे उत्पन्न मिळविले.  देवळा तालुक्याने ७ हजार मास्कची विक्री करून त्यातून ४४ हजार ५५७ रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. दिंडोरी तालुक्याने ३२ हजार १०० मास्कची निर्मिती करून ५ लाख ९३ हजाराचे उत्पन्न मिळविले आहे. इगतपुरी तालुक्याने १८ हजार ७७५ मास्कची विक्री करून त्यातून २ लाख ७३ हजाराचे उत्पन्न मिळविले आहे.

कळवण तालुक्यातील बचतगटाने ९ हजार ७५० मास्कची विक्री करून १ लाख ४८ हजाराचे उत्पन्न मिळविले आहे. मालेगाव तालुक्यात २२ हजार १८३ मास्कची विक्री करून त्यातून ३ लाख १८  हजाराचे उत्तन्न मिळविले आहे. नांदगाव तालुक्याने २८ हजार ४६५ मास्कची विक्री केली असून त्यातून ४ लाख ७० हजार ९०० इतके उत्पन्न मिळविले आहे. पेठ तालुक्याने ७ हजार ८७० मास्कची विक्री करून १ लाख ३२ हजार इतके उत्पन्न मिळविले आहे. सिन्नर तालुक्याने १७  हजार मास्कची विक्री करून २ लाख १६  हजार इतके उत्पन्न मिळविले आहे. सुरगाणा तालुक्याने ८ हजार ५५५ मास्कची विक्री करून १ लाख २१ हजार इतके उत्पन्न मिळविले आहे. येवला तालुक्यातील बचतगटांनी १७ हजार ८६० मास्कची विक्री करून १ लाख ४१ हजार हजार इतके उत्पन्न मिळविले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्याने  ६ हजार ४०० मास्कची विक्री करून ९० हजार ५०० रुपये इतके उत्पन्न मिळविले आहे.

लक्षणीय :

  • जिल्ह्यात १५ तालुक्यातील उपक्रम
  • २५३ बचत गटांचा समावेश
  • ४ लाख ३६ हजार मास्कची निर्मिती
  • ४ लाख ३३ हजार ४२८ मास्कची विक्री
  • ४२ लाख ५६ हजार रुपयांचे उत्पन्न
टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...

Previous Post

जळगाव जिल्ह्य़ात पुन्हा ७ रूग्ण कोरोना बाधित

Next Post

माता रमाईंना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अभिवादन

Next Post
माता रमाईंना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अभिवादन

माता रमाईंना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अभिवादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चोपडा शाखेच्या वतीने तसेच चोपडा सामान्य रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चोपडा शाखेच्या वतीने तसेच चोपडा सामान्य रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications