<
कळंब, प्रतिनिधी
उस्मानाबाद जिल्ह्यात दि.२७ रोजी ९ रुग्ण आढळून आले. यापैकी एक वाशी तालुक्यातील गोजवाडा येथील असून तो मुंबई वरून आलेला आहे, दुसरा उमरगा येथील असून पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहे तो ही मुंबई रिटर्न आहे , तिसरा रुग्ण उस्मानाबाद तालुक्यातील धुता येथील असून तोही पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील असून मुंबई रिटर्न आहे, चौथा रुग्ण हा लोहारा तालुक्यातील काटी चिंचोली येथील असून मुंबई रिटर्न आहे.
आज दिवसभरात ९ रुग्णाची वाढ झाल्याने जिल्ह्यातील रुग्णांचे अर्धशतक पूर्ण होऊन जिल्ह्यातील रुग्णसंख्या ५२ वर पोहोचली आहे. त्यापैकी ४० जण रुग्णालयात उपचार घेत असून 12 जण बरे होऊन घरी गेले आहेत. या दोन दिवसांत जिल्ह्यात 17 रुग्ण वाढल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे…