<
कळंब, तालुका प्रतिनिधी
कोरोना विषाणू संसर्गाच्या बाबतीत प्रशासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या जात आहेत.नागरिकांना कोरोना आजाराविषयी गांभीर्य असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दिनांक 30 व 31 मे 2020 रोजी रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात “जनता कर्फ्यू” चे आव्हान केले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील दवाखाने, दूध, मेडिकल वगळता इतर सर्व दुकाने व आस्थापना या ३० मे आणि ३१ मे रोजी दोन दिवस बंद राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिली. ३० आणि ३१ मे रोजी जनता कर्फ्यू घोषित केला असल्यामुळे दोन दिवस दुकाने बंद राहणार आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचे ६१ रुग्ण सापडले असून त्यापैकी १२ रुग्ण बरे झाले असून ४९ रुग्णावर उपचार सुरू आहेत. बाहेरून आलेल्या नागरिकांची वैद्यकीय तपासणी करणे सुरु असून त्यांना कवारनटाईन केले जात आहे. बाहेरून आलेल्या नागरिकांपासून सर्वाधिक धोका असल्याने प्रशासन व नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.