<
सत्यमेव जयते चा इम्पॅक्ट ; बार्टीच्या विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाली असून वेतनही खात्यात मिळाले आहे.
जळगांव(धर्मेश पालवे)- महाराष्ट्र राज्य सरकारच्या अंतर्गत बार्टी या शैक्षणिक संस्थे कडून निर्गमित व अधिकृत जळगांव जिल्हयातील स्पेक्ट्रम अकॅडमी या संस्थे मार्फत मार्च 2019ते जून2019 ला 100 विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळाले होते. यात आय बी पी एस या बॅच च्या कोचिंग साठी विद्यावेतन 3000 रुपये प्रति माह आणि या साठी लागणारे पुस्तक संच नियमित मिळणे अपेक्षित होते. निवड झालेल्या विद्यार्थी पैकी फक्त 30 विद्यार्थ्यांना पुस्तक मिळाली होती ,असून उर्वरित विद्यार्थी वंचीत होते.त्याच बरोबर 3हजार रुपये विद्यावेतन प्रतिमाह मिळणे अपेक्षित असतांना अभ्यासिका महिने संपले तरीही विद्यार्थ्यांना मिळाले नव्हते ,सदर कोचिंग साठी उत्तम व चांगल्या प्रति व प्रकाशन चे पुस्तके मिळणे अपेक्षित असतांना कमी दर्जाचे व प्रकाशनाचे पुस्तकं माथी मारली जात होती.मात्र जळगाव जिल्ह्यातील या संस्थेत बार्टी या संस्थे मार्फत पुस्तक खर्च पूर्ण दिला असल्याचं निष्पन्न असताना सुद्धा पैकी 20 विद्यार्थ्यानी सत्यमेव जयते ला भेट देऊन तक्रार केली होती,वंचीत विद्यार्थ्याना न्याय देण्यासाठी मदतीची अपेक्षा व्यक्त केली होती. तर काहींनी शैक्षणिक नुकसान होईल म्हणून नाव न सांगण्याच्या अटी वर तकार होती.मात्र सत्यमेव जयते च्या बातमी च्या इम्पॅक्ट मुळे सदर विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाली असून वेतनही खात्यात मिळाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमधे उत्साहाचे वातावरण आहे.