<
कळंब(प्रतिनिधी) :- दि. 31 रोजी शासकीय रुग्णालय उस्मानाबाद येथून 90 स्वाब तपासणी साठी पाठवले होते. त्यापैकी 80 रिपोर्ट प्राप्त झाले असून 2 अहवाल पॉसिटीव्ह आले आहेत तर 75 अहवाल नेगेटिव्ह आले आहेत तसेच 3 अहवाल inconclusive आले आहेत तर 10 अहवाल पेंडिंग आहेत. दोन पॉसिटीव्ह रुग्णामध्ये एक नळदुर्ग येथील 50 वर्ष महिला आहे तर दुसरा सुंभा येथील 53 वर्षीय पुरुष पूर्वीच्या रुग्णाच्या कॉन्टॅक्ट मधील आहे. या दोन्ही रुग्णांवर उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 73 झाली असून 19 जण बरे झाले असून घरी परतले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 52 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.