<
जळगाव – (धर्मेश पालवे) – आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला जितकी मरण यातना होत नसतील त्यापेक्षा जास्त मरणयातना मरणोत्तर सरकारी मदत घेतांना मयताची पत्नी मीनाबाई शामकांत सुर्यवंशी यांना झाल्या. शिवाय या मदतीसाठी लढताना जळगाव जिल्हा जागृत जनमंचचे अध्यक्ष शिवराम पाटील यांना मंत्री गुलाबराव पाटील व तहसीलदार हिंगे यांचा रोष ओढवून घ्यावा लागला.कारण ? जी मदत महिन्याभरात मिळायला हवी होती ती मदत तब्बल सहा महिन्यांनी मयताच्या पत्नीला तहसीलदार श्रीमती हिंगे यांनी सोपवली.जर शिवराम पाटील यांनी हा लढा दिला नसता तर त्याच गावात यावर्षी सात शेतकरी कर्जबाजारी होऊन मेले,तशीच स्थिती झाली असती .मदतीस मुकले असते. तत्कालीन तहसीलदार व आमदारांंनी याची दखल घेतलीच नाही.जळगाव तालुक्यातील आमोदे बु.येथील शेतकरी विनायक ओंकार सुर्यवंशी यांचेवर जेडीसीसी अंतर्गत आमोदे विकास सोसायटी चे कर्ज होते.२०१८ मधे महाराष्ट्र सरकारने कर्जमाफी जाहीर केली.त्यानुसाठी आमोदेबु येथील कर्जबाजारी शेतकरी विनायक ओंकार सुर्यवंशी कर्जमाफीस पात्र आहेत.कर्ज देणारी संस्था, वि का स सोसायटी आमोदे बु.ही होती.
कर्जमाफी अप्लिकेशन नंबर 20170905083409729 L ०००५४२७३७१ असा आहे.
अर्ज व यादी आमोदे विकास सोसायटी चे सचिव श्री परदेशी यांनी आनलाईन व ऑफलाईन जेडीसीसी बँक जळगाव येथे प्रस्तुत केली. मैनेजर जितेंद्र देशमुख यांनी डेप्युटी रजिस्टर (डी डी आर) जळगाव,जॉईंट रजिस्टर, नाशिक (डिजेआर) यांचे कडे पाठवली.वि का स सोसायटीचे ठिकाण आमोदे बु. तालुका जळगाव ऐवजी आमोदे बु.’तालुका यावल ‘ असे लिहीले.
रिव्हेरीफिकेशन लिस्ट मधे हे नांव आमोदे तालुका यावल ,असे चुकीने आढळले.याकारणे शेतकरी कर्जमाफी साठी वंचित राहिला.म्हणून सदर शेतकरीचा मुलगा ,शामकांत विनायक सुर्यवंशी यांनी कर्जबाजारी ला वंचित झाल्याने आत्महत्या केली.म्हणून सदर प्रकरण उघडकीस आले.आम्ही जळगाव जिल्हा जागृत जनमंच ने ही चूक लक्षात आणून दिली तेंव्हा जेडीसीसी चे मैनेजर जितेंद्र देशमुख यांनी ‘ सदर शेतकरी कर्जमाफीस पात्र असून रेकॉर्ड पुन्हा अपलोड करून मिळावे,अशी विनंती २२-२-१९ ला इमेल द्वारे वरिष्ठांना केलेली आहे.अद्याप विनायक ओंकार सुर्यवंशी यांना कर्जमाफी मिळाली नाही.पण कर्जमाफी न मिळाल्याने कर्जबाजारी शेतकरी शामकांत पाटील हे जीवनास मुकले.आमोदे बु.विकास सोसायटी चे सचिव श्री परदेशी ,जेडीसीसी बँकेचे मैनेजर जितेंद्र देशमुख व संबंधित कर्मचारी या प्रकरणात दोषी आहेत.यांच्याच चुकीमुळे कर्जमाफी मिळाली नाही.सदर शेतकऱ्याने आत्महत्या केली.म्हणून संबंधित सोसायटी व बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनातून १ लाख ५० हजार रूपये कपात करून शेतकरी ला रोख रक्कम देण्यात यावेत.अशी आम्ही जळगाव जिल्हा जागृत जनमंच ने मागणी केली आहे. कर्जमाफी मिळाल्यावर त्यांनी दिलेले दिड लाख रूपये परत करण्यात येईल.अशी मागणी आम्ही जळगाव जिल्हा जागृत जनमंच ने केली आहे.कर्मचारी व आधिकाऱ्यांची जबाबदारी आहे तर ती पुर्ण करवून घेतली पाहिजे.
यावर नियंत्रण ठेवणारे चेयरमन आणि सहकारमंत्री ही बेफिकीर असल्याचे आढळले.जळगाव ग्रामीण चे आमदार हे सहकार राज्य मंत्री असूनही त्यांच्याच मतदाराला कर्जमाफी देतांना त्यांच्याच खात्याच्या आधिकाऱ्याने मिळू दिली नाही,आत्महत्या झाल्यानंतर ११ दिवस आत्महत्या ग्रस्त कुटुंबाची कोणीही दखल न घेतल्याने शिवराम पाटील यांनी मयताचे वडिलांना सोबत घेऊन लढा दिला.उपोषण केले. तेंव्हा महसूल व पोलिस खात्याचा अहवाल कलेक्टर कडे पोहचला ९-५-२०१९ला कलेक्टर ने एक लाखाची मदत मंजूर करून धनादेश देण्याचे आदेश तहसीलदाराला दिले.पण मंत्रीचे हस्ते धनादेश देण्यापायी तब्बल पुन्हा तीन महिने मयताच्या कुटुबियांना ताटकळत ठेवले.पण शिवराम पाटील यांनी कलेक्टर ला तसे पत्र देऊन नाराजी व्यक्त केली.म्हणून तहसीलदार श्रीमंत मती हिंगे या शिवराम पाटील यांचेवर नाराज झाल्या.कर्तव्याची जाणीव आणि कार्यपद्धती तील चुका लक्षात आणून दिल्याने आधिकारी नाराज होतात तरीही आपले कर्तव्य वेळेवर निभावत नसल्याचे दिसत नाही,आज गुलाबराव पाटील यांचे हस्ते तहसीलदार कार्यालयात मयताचे वडील व पत्नीला बोलवून धनादेश सोपवला. मंत्री गुलाबराव पाटील यांनी फोटो काढून श्रेय घेतले पण लढा शिवराम पाटील जिंकले.हे सुर्यप्रकाशाइतके सत्य कोणीही नाकारणार नाही.