<
जळगांव(प्रतिनिधी)- आपल्या सर्वांसमोर कोव्हिड१९ च संकट खूप मोठ्या पप्रमाणात थैमान घालत आहे. आणि या काळात कोणत्याही परिस्थितीत नेहमी त्यांच्या परिवाराला सोडून नेहमी सेवेसाठी उभे असलेले आपल्या पोलीस प्रशासनाला आपण विसरू शकत नाही. २०१९ नंतर आपण पोलीस भरती केलेली नाही आणि आता त्याला अनुकुल अस वेळ ही नाही त्या मुळे पोलीस दलातील पोलीस संख्या लोकसंखेच्या तुलनेत कमी असल्याचे जाणवते. महाराष्ट्र पोलीस आणि राज्य राखीव पोलीस(SRPF) यांच्या२०१७ आणि २०१८ प्रतीक्षा यादीत असलेल्या युवक हे आधीपासून पोलीस दलासाठी लागणाऱ्या नियमावलीमध्ये शारीरिक व बैद्धीक परिपूर्ण आहे. अश्या काळात पोलीस प्रशासणावर येणार ताण लक्षात घेता २०१७ आणि २०१८ च्या झालेल्या महाराष्ट्र पोलीस आणि राज्य राखीव पोलीस दार(SRPF) यांच्या प्रतीक्षा यादी मध्ये असलेले सर्व युवक याना भरती करण्यात यावे अशी विनंती. यामूळे पोलीस प्रशासनावरचा ताण पण कमी होईल आणि आर्थिक दृष्ट्या सुद्धा सोईचे राहील. असे केल्यास पोलीस प्रशासनावरचा ताण सुद्धा कमी होईल आणि प्रतीक्षा यादी मध्ये असलेले युवकांना सुद्धा सेवा करण्याची संधी मिळेल. अशी विनंती वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदचे जळगांव जिल्हाअध्यक्ष शिवश्री.रुपेश महाजन यांनी ई-मेल द्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब यांना केली. या विनंतीने बऱ्याच युवकांना प्रशासनात संधी मिळेल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.