<
फैजपूर(किरण पाटिल)- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरुड (ता.यावल) गावातील सर्व नागरिकांची थर्मल स्क्रीनिंग व प्लस ऑक्सी मीटरद्वारे आरोग्य तपासणी केली जात आहे. डॉ.फिरोज तडवी (एम.ओ), डॉ.अतुल वायकोळे (सी.एच.ओ)यांच्या मार्गदर्शना खाली आरोग्यसेविका वैशाली तळेले शारदा कोळी आशा वर्कर, रजनी चौधरी अंगणवाडी मदतनीस, वैशाली कोळी बचत गट सीआरपी, स्वाती कोल्हे बचत गट अध्यक्ष, आरोग्य सेवक अविनाश तायडे, राहुल कोल्हे यांच्या पुढाकाराने आरोग्य तपासणीची मोहीम राबवली जात आहे. गावातील प्रत्येक घरी जाऊन नागरिकांची तपासणी करून नोंदी घेत आहेत. त्याची माहिती आरोग्य विभागाकडे सादर केली जात आहे. आरोग्य तपासणीच्या या मोहिमेत नागरिकांना फिजिकल डीस्टीसिंग पाळण्याचेआव्हान केले जात आहे. गावातील प्रत्येक ग्रामस्थांना प्राणायाम आणि व्यायाम करण्याचा सल्ला आणि प्रात्यक्षित करून दाखवण्यात येत आहे.