<
कळंब | प्रतिनिधी (हर्षवर्धन मडके)
कळंब तालुक्यातील मोहा येथील ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरूजींची जयंती साजरी करण्यात आली, प्रसंगी अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष बाबासाहेब मडके हे होते तर शि.म. ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेटचे चेअरमन हनुमंत मडके, संस्थेचे ज्येष्ठ संचालक तात्यासाहेब पाटील, प्रशासकीय अधिकारी रमेशभाऊ मोहेकर, विविध सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन तथा शालेय समिती सदस्य गौतमआप्पा मडके, शालेय समितीच्या सदस्या प्रा. श्रीमती सुरेखा तांबारे, उपसरपंच सोमनाथ मडके, मुख्याध्यापक तथा प्राचार्य टी. जे. चौधरी, तसेच पर्यवेक्षक वाय.बी. सावंत ,उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रा आप्पासाहेब मिटकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी ज्ञानप्रसार उच्च माध्यमिक विद्यालयातील बारावीमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये विज्ञान विभागातून प्रथम कसबे प्रतिमा रमेश, द्वितीय माळी अर्चना उद्धव, तृतीय मडके आरती शरद तर कला शाखेतून प्रथम सावंत आरती नानासाहेब, द्वितीय सावंत प्रियंका नानासाहेब, तृतीय नागरगोजे कोमल बबन तसेच वाणिज्य(संयुक्त) शाखेतून प्रथम जाधव भाग्यश्री शाहू द्वितीय अंकुश श्वेता दशरथ तृतीय थोडसरे किर्ती सुरेश हे विद्यार्थी या सत्काराचे मानकरी ठरले. सहकार या विषयात 99 गुण घेणाऱ्या भाग्यश्री जाधव या विद्यार्थीनीचा विशेष सत्कार प्रा.सुनिल साबळे व प्रा. नवनाथ करंजकर यांनी रोख रक्कम देवून केला. याप्रसंगी हनुमंत तात्या मडके यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन प्रा. शेखर गिरी यांनी केले.त्यानंतर मोहेकर गुरूजींच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या तसेच विद्यार्थ्यांच्या हस्ते विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.याप्रसंगी शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.