<
मण्याड धरण आज दि. १/८/२०२० सकाळ पर्यंत ९५ टक्के भरले आहे, आज दिवसभरात ओव्हरफ्लो होईल अशी शक्यता आहे, मण्याड धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील धरणात पाण्याचा विसर्ग चालु आहे त्या मुळे मण्याड धरण केव्हाही १००% साठा होवुन मण्याड धरणाच्या सांडव्याद्वारे मण्याड नदित धरणाखाली विसर्ग चालु होवु शकतो व मण्याड नदी पुढे सायगांव ता. चाळिसगांव येथे गिरणा नदीस पुर केव्हाही येवु शकतो तरी कृपया आपल्या यंत्रणेव्दारे मण्याड व गिरणा नदिच्या काठावरील गावांना सावधगिरीच्या सुचना देण्यात आल्या आहेत असे, श्री हेमंत व्हीं. पाटील, उप विभागीय अभियंता, पाटबंधारे उपविभाग, चाळीसगाव यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.