<
जळगाव : जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात जिल्ह्यातील २५५व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे तर आज २८४ रुग्ण आज बरे देखील झाले असून आतापर्यंत ७८४१ रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील ६९,(०६RATI),भुसावळ ०९,(०३ RATI), अमळनेर ०५,(११ RATI), चोपडा ०५,(१५ RATI),पाचोरा १२, (११ RATI), भडगाव ०८,(०३ RATI), धरणगाव १७, (०८RATI),यावल ०१, (००RATI), एरंडोल ००,(००RATI), जामनेर ०५,(३०RATI), जळगाव ग्रामीण १८,(००RATI), रावेर ०१, (०८RATI), पारोळा ०४,(०२ RATI), चाळीसगाव २४,(०३RATI), मुक्ताईनगर ००, (०६RATI), बोदवड ००,(००RATI),दुसर्या जिल्ह्यातील-०१, (०० RATI),जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या ११३८८ इतकी झाली आहे.आज ०९ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत ५२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.तर एकूण ३०२० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत वाढ होत आहे.