<
जळगाव, दि. 13 – हतनूर मोठ्या प्रकल्पावरील जलाशय, कालवा 0 ते 92 कि.मी. पर्यंतच्या तापी नदी व सुकी, अंभोरा, तोंडापूर, मोर, व मंगरुळ मध्यम प्रकल्पावर व म्हसाळा, पिंपळगाव हरेश्वर, सार्विपिंप्री, कळमसरा, चिलगाव, शेवगा, भागदना, पिंप्री, गोद्री या लघु प्रकल्पांवरील कालव्याच्या वितरीकांवर प्रवाही जलाशय कालव्यावार उपसा व नदी नाले सिंचनाने पाण्याचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभधारकांना खरीप हंगाम 2019-2020 यात नवीन उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा साठा गृहीत धरून तसेच सिंचनासाठी नवीन पाणी उपलब्ध झाल्यास 1 जुलै ते 14 ऑक्टोबर या मुदतीकरीता खरीप हंगामी पिके, साळ/ज्वारी व इतर अन्नधान्य, भुसार पिके, कपाशी, भुईमुग व हंगामी भाजीपाला यासारख्या पिकांना अटी व शर्तींच्या अधिन राहून पाणी अर्ज नमुना क्रमांक 7 भरून पाणी अर्ज 31 ऑगस्ट, 2019 पर्यंत आपल्या भागातील शाखाधिकारी यांचे शाखा कार्यालयात कार्यालयीन वेळेत पोष्टाने अगर प्रत्यक्ष देण्याचे करावे. असे कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.