<
मुंबई(प्रतीनिधी)- शास्त्राप्रमाणे श्रावण पौर्णिमेस सागराची पूजा करून त्याला श्रीफळ अर्पण करतात म्हणून या दिवसाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात. समुद्र किनारी राहणारा कोळी समाज नारळी पौर्णिमा हा सण साजरा करतात. समुद्राला नारळ अर्पण करून हा समाज आपली कृतज्ञता व्यक्त करतात. वरूण हा समुद्राचा रक्षक समजला जातो. त्याच्या पूजनाने सारी संकट टळावी अशी कामना केली जाते. समुद्राला नारळ अर्पण करत पूजा करतात. म्हणून या सणाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात. यादिवशी कोळी लोक आपल्या होळ्या घेऊन मासेमारी करण्यासाठी समुद्रात जातात. या दिवशी होड्याना रंगरंगोटी करून सजविण्यात येतात. काही ठिकाणी तर कोळी बांधवांकडून भव्य मिरवणुका देखील काढण्यात येतात, अशी प्रथा आहे. पावसाळा हा माश्यांच्या प्रजननाचा काळ असल्याने कोळी बांधव या काळात मासेमारी करत नाहीत. श्रावणी पौर्णिमेस सागराला श्रीफळ अर्पण करून सागरपूजन झाले कि त्यानंतरच समुद्रात होड्या घेऊन मासेमारी सुरु होते.या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ शुभसूचक मानले जाते, तसेच ते सर्जनशक्तीचेही प्रतीक मानलेले आहे. यामुळे समुद्राला नारळ अर्पण करतांना तो पाण्यात फेकू नका, तर हळुवारपणे सोडा ! नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरुणदेवतेला आवाहन करून सागराला नारळ अर्पण करतात. महाराष्ट्रात नारळी पौर्णिमेदिवशी नाराळाचे विविध पदार्थ बनवले जातात. यामध्ये नारळी भात, नाराळाच्या वड्या असे गोडाधोडाचे पदार्थ बनवून हा सण साजरा केला जातो.