<
जळगाव. दि.14- महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे डी. एल. एड प्रथम वर्ष ऑनलाईन 2019-2020 या शैक्षणिक वर्षासाठी शासकीय कोट्यातील रिक्त जागांच्या प्रवेशासाठी यापूर्वी दिलेल्या 2 ऑगस्ट, 2019 या मुदतीत वाढ करण्यात आली असून आता प्रवेशासाठी 20 ऑगस्ट 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रीया राबवितांना प्रवेश घेण्यासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राध्यान्य अशाप्रकारे राबविण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे यांच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करू शकतील.
शैक्षणिक पात्रता:- इयत्ता 12 वी उत्तीर्ण, खुला संवर्गासाठी 49.5 टक्के व मागासवर्ग संवर्गासाठी 44.5 टक्के गुण असणे आवश्यक आहे. प्रवेश अर्ज ऑनलाईन भरण्याची शेवटची मुदत दिनांक 20 ऑगस्ट, 2019 पर्यंत आहे. पडताळणी केंद्रावर जावुन मुळ प्रमाणपत्रे पडताळणी करुन घेणे व ऑनलाईन प्रवेश पत्र प्राप्त करण्याची मुदत 21 ऑगस्ट, 2019 पर्यंत आहे. प्रवेश अर्ज शुल्क खुला संवर्ग रुपये 200/- मागासवर्गीय सवंर्ग रुपये 100/- असे आहेत.
यापुर्वी ज्यांनी अर्ज पुर्ण भरुन Approve करुन घेतला आहे. परंतू प्रवेश घेतलेल नाही असे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. ज्यांचा अर्ज अपूर्ण किंवा दुरुस्ती (Correction) मध्ये आहे तसेच नव्याने प्रवेश अर्ज भरुन प्रवेश घेण्यास इच्छुक असलेले उमेदवार अर्ज पुर्ण भरु शकतात. पडताळणी केंद्रावर जावुन अर्ज ऑनलाईन Approve केल्याशिवाय उमेदवाराचा प्रक्रियेत समावेश होणार नाही. या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्याने स्वत:च्या लॉगीनमधुनच प्रवेश घ्यावयाचा आहे. अध्यापक विद्यालयाची स्वत: निवड करुन लगेचच प्रवेशपत्र स्वत: ई-मेल/लॉगीनमधुन प्रिंट घेवुन अध्यापक विद्यालयात चार दिवसाच्या आत प्रत्यक्ष प्रवेश घ्यावा. यानंतर (D.El.Ed) प्रवेशासाठी कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी, असे आवाहन जळगाव जिल्हा शैक्षणिक सातत्यपुर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या प्राचार्य डॉ. मंजुषा क्षीरसागर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.