<
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी असे उपक्रम गरजेचे – सुवर्णा अडकमोल
जळगांव (प्रतिनिधी) वाढते तापमान,कमालीचा उकाडा,पाण्याचे दुर्भिक्ष, पावसाची अनिश्चिती,जास्त प्रमाणात झालेली वृक्ष तोड यामुळे भविष्यात होणारे दुष्परिणाम लक्षात घेत व शासनाने केलेल्या ३ कोटी वृक्षा रोपण या संकल्पनेस अल्प स्वरूपात हातभार लावण्यासाठी शिव कॉलनी येथील सरस्वती विद्या मंदिर या शाळेतील इयत्ता पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांनी जांभुळ, सिताफळ, गुलमोहर, नीम, गुलमोहर, नीम या बियांचे संकलन करून २०० सीडबाॅल बनवून मारोती पार्क परिसरात रस्त्याच्या कडेला लागवड करण्यात आले.झाडे लावा, पर्यावरण वाचवा हा संदेश देण्यात आला.
या वेळी सुवर्णा अडकमोल व सविता ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना सीडबॉल बाबत माहिती देत मार्गदर्शन केले व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी असे उपक्रम राबविले पाहिजे असे मत सुवर्णा अडकमोल यांनी व्यक्त केले.
या उपक्रमास मारोती पार्क परिसरातील महाराष्ट्र राज्य प्राधिकरण अधिकारी अभियंता व संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील उपस्थित होते तसेच उपक्रमाचे आयोजन व नियोजन सुवर्णलता अडकमोल व सविता ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या
या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वसाने मॅडम यांनी या उपक्रमाला प्रोत्साहन देत
भारंबे मॅडम, सुदर्शन पाटील सर.यांनी सहकार्य केले.