<
पुणे – (प्रतिनिधी) – येथील नामवंत आस्वाद व्हेज – नॉनव्हेज हॉटेलने आपली पुण्यात एक आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त आस्वाद हॉटेल चे संचालक श्री. केतनदादा गवळी यांच्या सोबत खास बातचीत.
सविस्तर असे की, या आस्वाद हॉटेलमधे भारतीय जवानांना मोफत जेवण देण्यात येते. आस्वाद हॉटेल चे संचालक श्री. केतनदादा गवळी यांनी आमच्या सत्यमेव जयते च्या प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले. तसेच आस्वाद हॉटेलचे संचालक श्री. केतन गवळी यांच्या विषयी जाणुन घ्यायचे म्हटले तर तसे ते मुळचे जळगाव खान्देश चेच रहिवासी आहेत. जळगाव येथे समाजकार्य पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर व्यवसाय करायचा म्हणून पुण्यात स्थायिक झालेत. समाजकार्य करण्याची त्यांची तळमळ आधिपासुनच जळगावात होती. पण एखाद्या व्यक्तीने चक्क आपल्या हॉटेलात भारतीय सैनिकांना मोफत भोजन देण्याचे व्रत घेतल्याचे पहिल्यांदाच पहायला मिळाले. एकिकडे आपण बघत असतो हॉटेल चालकाचे व कस्टमरचे बिलांवरुन वांदग होत असतात. पण या ठिकाणी अतिशय मनापासून आपल्या भारतीय जवानांची जेवणाची व्यवस्था करण्यात येत असते, तेही अतिशय आदरातिथ्याने. त्यांनी प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले की, भारतातील प्रत्येक नागरिकाचे भारतीय जवानांविषयी देणे लागते. त्यामुळे प्रत्येकानेच आपापल्या परिने भारतीय सैनिकांची आदरातिथ्याने सेवा करायला हवी. या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे आस्वाद हॉटेलचे नाव पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लौकिक होत आहे. या हॉटेलचा आदर्श इतर हॉटेल संचालकांनी देखील घ्यावा अशी अपेक्षा जनमानसात आहे.