<
जळगाव – दिनांक 20 /12/ 2020 वार रविवार रोजी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा जळगाव अंतर्गत कृषी विभागाचा कर्मचारी मेळावा करंजी तालुका बोदवड येथे शेती शिवारात कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष मा. रवींद्र तायडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा सचिव ब्रह्मानंद तायडे, उपाध्यक्ष मिलिंद वाल्हे, शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष बापू साळुंके, जिल्हा संघटक किशोर मैराले,यांच्या उपस्थितीत पार पडला. या मेळाव्यात पुढील प्रमाणे कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला श्रीमती एस. बी. अडकमोल, श्रीमती एस. आर. कंकाळ ,श्रीमती एम.बी. तायडे ,श्री ए. टी. वाघ, राजेंद्र कंकाळ, एस. डी. शिंदे, ए.डी. वाघ , एस. एन.चौधरी, व्ही. एच. भोसले, जी.सी. इंगळे, के. एच. दिपके, भारत इंगळे, श्रीमती संगीता वाघ, श्रीमती एम. पी. कोंघे. मेळाव्यात कृषी विभागाची जिल्हा कार्यकारिणी तयार करण्याबद्दल ठराव करण्यात आला. तसेच कर्मचार्यांच्या अडीअडचणींवर चर्चा करण्यात आली. संघटना का? व कशी? महत्त्वाची आहे हे अध्यक्ष यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दिपके यांनी केले तर आभार श्री शिंदे यांनी मानले.