<
पहुर ता जामनेर;- येथून जवळ असलेल्या लोंढ्ररी गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुस्लिम कार्यकर्त्यांचा नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते भाजपा उपस्थितीत भाजपा अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष शेख सलिम शेख गणी यांच्या विशेष प्रयत्नातून लोंढ्ररी गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीडशे मुस्लिम कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला. पाच जुलै रोजी आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते हा प्रवेश सोहळा झाला. येथील मुस्लीम मोहल्ल्यात छोटासा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात ढोल-ताशाच्या फटाक्यांच्या आतिषबाजीत नामदार गिरीश महाजन यांचे स्वागत करण्यात आले . या प्रवेश सोहळ्यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे, धनगर समाज उत्तर महाराष्ट्र प्रमुख रामेश्वर पाटील, भाजपा अल्पसंख्य आघाडीप्रमुख शेख सलीम शेख गणी, भाजपा व्यापारी आघाडी प्रमुख ललित लोढा, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजय देशमुख, एडवोकेट संजय पाटील ,माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोगडे ,स्थानक भाजपा नेते राजमल भागवत ,राजेंद्र जैन ,जेके चव्हाण, डॉक्टर सुभाष चिकटे, ज्ञानेश्वर नाईक ,असलम पठाण, उमर हाजी इक्बाल भाई युनूस भाई ,आदी मान्यवरांच्या उपस्थित हा प्रवेश सोहळा झाला . याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुस्लिम कार्यकर्त्यांनी भाजपा प्रवेश घेतला . यात सय्यद अ यास शेख गयास पटेल ,सय्यद मुक्तार शेख गुलशर पटेल, शेख सुलेमान हाजी राज महंमद सय्यद ,याकुब शेख मंसुख पटेल ,सय्यद नुरा शेख अश्रफ पटेल, सय्यद फय्याज सय्यद गयास पटेल ,सय्यद अख्तर सय्यद, अहमद पटेल, शेख मुशिर् शेख अहमद शेख, याकुब शे मज्जिद आसिफ, हाजी राजमहमद शेख जब्बार शे गफूर यांच्यासह तीनशे मुस्लिम कार्यकर्त्यांनी नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते भाजपात जाहीर प्रवेश केला याप्रसंगी गावातील भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुस्लिम कार्यकर्त्यांनी भाजपा प्रवेश केल्यामुळे होऊ घातलेल्या विधानसभेत आमदार गिरीश महाजन यांचे आज मुस्लिम समाजामुळे पारडे जड झाले असून या मुस्लिम समाज यामुळे आमदार गिरीश महाजन यांचे मताधिक्य वाढणार असून आगामीा सर्व निवडणुकांमध्ये लोंढरी गावात भाजपाची ताकद वाढणार आहे.