<
जळगाव, (प्रतिनिधी)-पत्रकार हा समाजाच्या आरसा आहे,आम्ही राजकारणी लोकांना घडविण्यात पत्रकार यांचे मोठे योगदान आहे. मी आज जिल्ह्याच्या पालकमंत्री जरी असलो तरी सुरवातीच्या काळात सेनेतर्फे आंदोलन करणे,कार्यक्रम घेणे यांची प्रसिध्दी आपणच केली आहे.
पत्रकार बन्सी सर यांच्या परिवारास मुख्यमंत्री यांनी जाहिर केलेल्या विमाच्या रकमेसाठी प्रयत्न करून मिळवून देणार.
कोरोनाच्या काळात जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांनी जीवाची पर्वा न करता चांगले वृत्ताकन केले. आज त्यांच्या सन्मान करतांना आनंद वाटत असल्याचं प्रतिपादन पाणी पुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मूकनायक व जीवनगौरव पुरस्कार वितरण प्रसंगी केले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते लोकमत जळगाव आवृत्तीचे संपादक मिलिंद कुळकर्णी यांना ‘मूकनायक’ तर जेष्ठ पत्रकार चंदू नेवे यांना जीवनगौरव पुरस्कार दि.26 जानेवारी रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे सकाळी 10:20 वाजता वितरित करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार विजय पाठक होते. तर यावेळी व्यासपीठावर माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महापौर सौ.भारती सोनवणे, आमदार राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा शल्यचिकित्सक नागोजीराव चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ.रामानंद, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, श्री राजपूत करणी सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविणसिंग पाटील, संगीता पाटील,पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे, खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, उत्तर महाराष्ट्र कार्यध्यक्ष डिगंबर महाले, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख मिलिंद लोखंडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रदीप गायके, धरणगाव पंचायत समिती सभापती मुकुंदराव नन्नवरे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरवातीला राज्य पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे यांनी प्रास्ताविकातून पत्रकार संघाच्या कार्यावर प्रकाशझोत टाकत पत्रकारिता क्षेत्रात व्रतस्थ भावनेने सेवा करणाऱ्या ऋषितुल्य पत्रकारांचे विविध पुरस्कार देऊन सन्मानित करीत असल्याचं सांगत मूकनायक व जीवन गौरव पुरस्कार आज वितरण होत असल्याचं ते यावेळी म्हणाले. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या जळगाव जिल्ह्यातील लोकमतचे पत्रकार स्व. बन्सी सर व राज्यातील पत्रकारांना पन्नास लाखाचा विमा देण्याबाबत प्रयत्न व्हावेत अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
यांचा कोरोना योद्धा म्हणून झाला सन्मान
जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, एबीपी माझाचे रिपोर्टर चंद्रशेखर नेवे,आरोग्य दूत अरविंद देशमुख, लोकमत छायाचित्रकार सचिन पाटील, सकाळ छायाचित्रकार संधींपाल वानखेडे,दिव्यमराठी छायाचित्रकार आबा मकासरे, देशदूत उपसंपादक किशोर पाटील, लोकमत उपसंपादक आनंद सुरवाडे, लाईव्ह ट्रेंडचे उपसंपादक जितेंद्र कोतवाल, ईबीएमचे रिपोर्टर जुगल पाटील,ई टीव्ही भारतचे रिपोर्टर प्रशांत भदाणे,पत्रकार भूषण महाजन,लोकमचे जामनेर तालुका प्रतिनिधी मोहन सारस्वत, श्रीमती भानूबेन बाबुलाल शाह गोशाळा अमळनेर, आरोग्यक्षेत्र गजानन सूर्यवंशी, आरोग्य दूत राकेश चौधरी,भूषण पाटील, धनंजय सोनवणे, टिव्ही – ९ चे प्रतिनिधी अनिल केर्हाडे, आकाश धनगर,उपशिक्षिका सौ. सुवर्णा जितेंद्र पाटील,सौ. सीमा शरद कुळकर्णी,सकाळ चे पहूर प्रतिनिधी शंकर भामरे अशा एकूण 23 कोरोना योध्यांना शिल्ड व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
रक्तदान शिबीर
यावेळी रेड पल्स रक्तपेढी यांच्या सौजन्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी 21 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी रेड पल्स रक्तपेढी चे संचालक व पदाधिकारी डॉ. मोईज देशपांडे. डॉ. मिनाझ पटेल. डॉ. भरत गायकवाड. डॉ फारूक शेख. सुरज पाटील.अख्तर अली. रवींद्र पाटील. विवेक महाजन. प्रकाश सपकाळ. गणेश निभाळकर उपस्थित होते.
कर्यक्रमाचे सूत्रसंचालन डिगंबर महाले तर आभार शरद कुळकर्णी यांनी मांडले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पत्रकार संघांचे भगवान मराठे,नाजनीन शेख, संजय चौधरी,नारायण पवार,दीपक सपकाळे,प्रमोद सोनवणे,कमलेश देवरे,मिलिंद सोनवणे,गोपाळ सोनवणे, वसंतराव पाटील,विलास ताठे, विनोद कोळी, इम्रान शेख, चेतन निंबोळकर,संतोष ढिवरे,सुकलाल सुरवाडे, स्वप्नील सोनवणे,संजय तांबे,सुनील भोळे,आदींनी परिश्रम घेतले.