Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बँकांनी नव्याने लावलेले मनमानी शुल्क तात्काळ रद्द करावे!

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/01/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

‘फॅम’ने दिले केंद्रीय अर्थमंत्री, रिझर्व्ह बँकेला निवेदन : उपाध्यक्ष ललीत बरडीया यांची माहिती

जळगाव, दि.२८ – देशातील सर्व बँकांद्वारे नव्याने लावण्यास सुरुवात केलेले चार्जेस बंद करावेत, या मागणीचे निवेदन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन व रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना फॅमच्या माध्यमातून दिल्याची माहिती फॅमचे उपाध्यक्ष
ललित बरडीया यांनी दिली आहे.

२० जानेवारी २०२१ पासून देशातील सर्व बँकांनी ५० हजार रुपयांच्या जास्त रोख रक्कम बँकेत जमा करण्यासाठी प्रति एक हजार रुपयांना अडीच रुपये चार्ज लावण्यास सुरुवात केली आहे. तसेच, कॅश हँडलिंग चार्ज, चेक रिटर्न चार्ज, क्रेडिट, डेबिट कार्ड स्वाईप मशीनसाठी चार्ज, डिजिटल पेमेंट्सवर चार्ज, एनईएफटी, आरटीजीएससाठी चार्ज आदी अनेक प्रकारचे नवीन किंवा वाढीव चार्जेस लावत आहेत. त्यास महाराष्ट्रातील
व्यापाऱ्यांच्या संघटनांची शिखर संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्रने विरोध केला आहे. बँकांद्वारे लावण्यात येत असलेले हे चार्जेस तत्काळ बंद करावेत, याबाबतचे निवेदन फॅमचे अध्यक्ष विनेश मेहता, महासंचालक आशिष मेहता, उपाध्यक्ष ललित बरडीया यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी दिले आहे.

कोविडमुळे संपूर्ण देश आर्थिक दृष्ट्या डबघाईला आलेला असताना, सर्वसामान्य लोक, व्यापारी छोटे उद्योजक एकंदरीत सर्वच घटक मोठ्या आर्थिक टंचाईचा सामना करीत असताना बँकांनी मनमानी पद्धतीने सुरू केलेले हे चार्जेस म्हणजे गरीब जनतेवर त्यात आधीच परिस्थितीचा सामना करीत असणाऱ्यांवर अन्याय आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. अनेकांचे पगार अर्ध्यावर आलेले आहेत. बऱ्याच छोट्या व्यावसायिकांचे व्यवसाय
डुबले आहेत, तर कित्येक जण जगण्यासाठी, वाईट काळातून सावरण्यासाठी संघर्ष करीत आहे. अशा परिस्थितीत बँकांकडून व्यापाऱ्यांना, नोकरदार वर्गाला, सामान्य नागरिकांना मदतीची अपेक्षा आहे. मात्र, त्याउलट बँका संकटात सापडलेल्या लोकांना अशाप्रकारे चार्जेस लावून अधिक अडचणी निर्माण करण्याचे काम करीत आहेत. सरकार एका बाजूला डिजिटल पेमेंट, कॅशलेस व्यवहारांचा वापर करण्यासाठी आग्रही आहे, तर दुसरीकडे बँकांनी या व्यवहारांवर अधिकचे चार्जेस लावण्याचा सपाटा लावला आहे. छोटे किराणा दुकानदार, फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते, हॉटेल व्यावसायिक इत्यादी छोटे व्यापारी यांचा संपूर्ण व्यवहार रोखीने होत असतो. त्यांना रोजची जमा झालेली रोख रक्कम बँकेत जमा करावी लागते. त्यास सुद्धा बँकेने चार्ज लावल्यास हा व्यापारी वर्ग अडचणीत येईल. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमन आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याकडे लक्ष घालून बँकांनी लावलेले मनमानी चार्जेसचे नियम तात्काळ हटवावे अशी मागणी फॅमने निवेदनाद्वारे केली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

राजकारण्यांना घडविण्यात पत्रकारांचे मोठे योगदान;मूकनायक व जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

Next Post

भडगांव यशस्विनी सामाजिक जनजागृती अभियान हळदी कुंकू समारंभ संपन्न

Next Post
भडगांव यशस्विनी सामाजिक जनजागृती अभियान हळदी कुंकू समारंभ संपन्न

भडगांव यशस्विनी सामाजिक जनजागृती अभियान हळदी कुंकू समारंभ संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d