<
बोदवड :- शहरातील पाणी टंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे. कित्येक दिवसापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. मार्च महिन्यापासून पाणीटंचाईचे प्रश्न उभे राहत आहे. प्रभाग क्रमांक सात मध्ये नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा सामाजिक कार्यकर्ते संजय वराडे स्वखर्चाने करत आहे. जिजाऊ नगर, शारदा कॉलनी, कुशल नगर भागातील नागरिकांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे. अनेक महिलांना व पुरुषांना कामधंदे सोडून पाण्यासाठी वणवण फिरावे लागत होते, याची दखल घेऊन सामाजिक कार्यकर्ते संजय वराडे यांनी भाड्याने टॅंकर व ट्रॅक्टरच्या साह्याने मोफत पाणी पुरवठा केल्याने या परिसरातील लोकांना दिलासा मिळत आहे. या सामाजिक कार्यकर्त्याला लोक प्रतिनिधी करायला पाहिजे अशी शहरातील नागरिकांमध्ये चर्चा आहे.